शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रात होणार स्मार्ट सिटीचा जागर

By admin | Updated: October 6, 2016 01:32 IST

राणेनगर येथील सार्वजनिक मित्रमंडळाचा उपक्रम

 इंदिरानगर : नवरात्रोत्सवाचा ज्वर दिवसेंदिवस वाढू लागला असून, शहरात उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर येथील सह्याद्री युवक मित्रमंडळ आणि अष्टविनायक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राणेनगर मैदान येथे रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.दररोज उत्साहात दांडिया खेळला जात असतानाच मंडळातर्फे महिलांना ‘नवदुर्गा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये कविता राऊत (क्रीडा), अपूर्वा जाखडी (अंतराळ क्षेत्र), सुनीता पाटील (सामाजिक कार्य), रजनी लिमये (शैक्षणिक कार्य), प्रतिभा आहेर (सायकलपटू), विद्या फडके यांच्यासह मनपा महिला सफाई कामगार, शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि परिवहन महामंडळात वाहक म्हणून कर्तव्य बजाविणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. नाशिक शहराची स्मार्ट सिटीमध्ये निवड झाल्याने येथे येणाऱ्या भाविकांना शहराबद्दल वाटणाऱ्या सूचना देण्याबाबत आवाहन क रण्यात आले असून, यातील निवडक सूचनांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अमोल जाधव आणि देवानंद बिरारी यांनी दिली. परिसरातील गणेश युवक मित्रमंडळ, बाजीराव फाउंडेशन, नवदुर्गा मित्रमंडळ, श्री साईराम सामाजिक बहुद्देशीय संस्था आदि सार्वजनिक मंडळांतर्फे पैठणी तसेच रोख स्वरूपातील बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. (वार्ताहर)