शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ला खोळंबा!

By admin | Updated: April 14, 2017 01:08 IST

मुहूर्त लाभेना : नियुक्त्या रखडल्या, तज्ज्ञ सल्लागारही मिळेना

नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकचा समावेश होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप ‘नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ या कंपनीच्या कामकाजाला प्रत्यक्ष मुहूर्त लाभू शकलेला नाही. कंपनीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापासून विविध पदांच्या नियुक्त्यांची प्रक्रियाही रखडली असून, तज्ज्ञ सल्लागारही मिळविण्यासाठी महापालिकेला झगडावे लागत आहे. त्यामुळे यावर्षीही स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प दृष्टीपथास येण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे.केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात दुसऱ्या फेरीत नाशिक उत्तीर्ण ठरले आणि एकूण २७ शहरांमध्ये नाशिकने ११व्या क्रमांकावर स्थान मिळविले. २० सप्टेंबर २०१६ रोजी नाशिकचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश झाल्याची घोषणा झाली. त्यानंतर, दि. २१ सप्टेंबर रोजी लगेचच एसपीव्ही अर्थात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीची पहिली बैठक उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत झाली. स्मार्ट सिटी अभियानासाठी नाशिक महापालिकेने ‘क्रिसिल’ या नामवंत संस्थेच्या माध्यमातून २१९४ कोटी रुपयांचा आराखडा तयार केलेला आहे. त्यात रेट्रोफिटिंग अंतर्गत जुन्या नाशिकचा पुनर्विकास, ग्रीनफिल्ड अंतर्गत हनुमानवाडीचा क्षेत्र विकास आणि पॅनसिटीमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करत पाणीपुरवठ्यासाठी स्मार्ट मीटर व स्काडा सिस्टम आणि पार्किंग व वाहतूक व्यवस्थेचा समावेश होता. कंपनी गठीत झाल्यानंतर प्रकल्प सल्लागार नेमण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली परंतु, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. तसेच कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदासह विविध पदे भरण्याची प्रक्रियाही अद्याप पूर्ण झालेली नाही. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांच्याकडे सोपविला आहे. पगार यांचा उपआयुक्तपदाचा प्रतिनियुक्तीचा कालवधी दि. ३ मार्च २०१७ रोजीच संपुष्टात आला आहे. त्यामुळे विजय पगार यांचीच मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करावी, असा प्रस्ताव आयुक्तांनी शासनाकडे पाठविला आहे, परंतु त्यावर शासनाने अद्याप कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. (प्रतिनिधी)