शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

क्षेत्रविकासातून साकारणार ‘स्मार्ट सिटी’

By admin | Updated: October 23, 2015 22:23 IST

महापालिकेतर्फे कार्यशाळा : लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या संकल्पनांची हवी जोड

नाशिक : हरितक्षेत्र, पुनर्विकास आणि रेट्रोफिटिंग या क्षेत्रविकासाच्या तीन पर्यायांच्या माध्यमातून नाशिकला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचे स्वप्न महापालिकेच्या वतीने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना दाखविण्यात आले. स्वप्ननगरी प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच घरपट्टी-पाणीपट्टी करवाढीचेही संकेत प्रशासनाकडून यावेळी देण्यात आले. दरम्यान, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागातून ‘स्मार्ट सिटी’ घडविण्याचा निर्धार करण्यात आला. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात पहिल्या टप्प्यात नाशिक शहराची निवड झालेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पात्र होण्यासाठी लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या संकल्पना-सहकार्यातून प्रस्ताव तयार केला जाणार असून, तो ३० नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे नगरसेवक आणि शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांसाठी महाकवी कालिदास कलामंदिरात दोन सत्रात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दोन्ही सत्रांत मार्गदर्शन करत नाशिक महापालिकेची सद्यस्थिती आणि भविष्यात राबवायच्या योजनांची माहिती दिली. गेडाम यांनी सांगितले, शहरांना स्वत:च्या पायावर उभे करणारे स्मार्ट सिटी अभियान आहे. या अभियानात वेगवेगळ्या संकल्पना ‘पीपीपी’च्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) माध्यमातून राबविण्यावर भर राहणार आहे. क्षेत्रविकासाच्या तीन पर्यायांतून स्मार्ट सिटी निर्माण करण्यात येईल. त्यासाठी विशिष्ट भाग निवडायचा असून, हरितक्षेत्र विकासासाठी सुमारे ५०० एकर जागा अपेक्षित आहे, तर पुनर्विकासासाठी २५० एकर आणि रेट्रोफिटिंगसाठी ५० एकर क्षेत्राची गरज भासणार आहे. सदर भाग निवडताना एकमत होणे आवश्यक आहे. त्यासाठी कुठून सुरुवात करायची याचा निर्णय महापालिकेच्या महासभेने घ्यायचा आहे. आहे त्या परिस्थितीत सुधारणा रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून करता येऊ शकेल.

उदासीन लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिकमहापालिकेने ‘स्मार्ट सिटी’ संदर्भात दोन सत्रांत कार्यशाळा आयोजित केली होती. पहिले सत्र खास नगरसेवकांसाठी ठेवण्यात आले, तर दुसरे सत्र नागरिकांसह विविध संघटनांसाठी खुले होते. मात्र, नगरसेवकांसाठी ठेवण्यात आलेल्या सत्राला १२७ पैकी अवघ्या ३५ ते ४0 नगरसेवकांनीच हजेरी लावली. त्यातही प्रामुख्याने मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांचा सर्वाधिक सहभाग होता. केंद्र व राज्य सरकारमधील सत्ताधारी भाजपाच्या आमदार सीमा हिरे, गटनेते संभाजी मोरुस्कर, सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, कुणाल वाघ यांची उपस्थिती लाभली, परंतु दीपप्रज्वलन झाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी सभागृह सोडले. शिवसेनेच्या नगरसेवकांचीही अनुपस्थिती दिसून आली. दुसर्‍या सत्राला मात्र कालिदास कलामंदिर नागरिकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले. त्यात तुलनेने कमी असलेल्या स्मार्ट नाशिककरांचीही संख्या चर्चेचा विषय ठरली.