शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट कॅन्टोन्मेंट’मध्ये देवळालीचा समावेश?

By admin | Updated: December 2, 2015 22:37 IST

‘स्मार्ट कॅन्टोन्मेंट’मध्ये देवळालीचा समावेश?

नाशिकरोड : देशातील छावणी परिषदेत ‘अ’ वर्गात मोडणाऱ्या देवळाली छावणी परिषदेचा स्मार्ट कॅन्टोन्मेंटमध्ये समावेश करण्यास केंद्र सरकार विचाराधीन असून, संरक्षणमंत्री यांनी गेल्या महिन्यात पाठविलेल्या पत्राला लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. देशामध्ये स्मार्ट सिटीबरोबर स्मार्ट छावणी परिषदेची निवडप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नाशिक मनपा हद्दीशेजारील मोठ्या प्रमाणावर विकसित होणारी देवळाली छावणी परिषदेची हद्द आहे. लष्कराचे महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र व एअरफोर्स स्टेशन देवळालीच्या अखत्यारीत येते. नाशिक शहरालगतची पाच हजार एकर जागा ही नागरी वसाहतीची असून, त्यामध्ये चाळीस खेड्यांचा समावेश आहे. त्यामुळे देवळाली छावणी परिषदेचा स्मार्ट कॅन्टोन्मेंटमध्ये समावेश झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा आजूबाजूच्या खेड्यांना होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले. याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी खासदार गोडसे यांनी सविस्तर चर्चा केली. संरक्षण विभागाचे डायरेक्टर जनरल यांनी दिलेल्या अभिप्रायानंतर स्मार्ट कॅन्टोन्मेंटमध्ये घनकचऱ्याच्या माध्यमातून वीजनिर्मिती, ड्रेनेजच्या पाण्याचा योग्य वापर, रेन हार्वेस्टिंग आणि पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरेशनबाबत अधिक चांगल्या सुविधा होऊ शकतात. अशा प्रकारचे मेगा प्रोजेक्ट कॅन्टोन्मेंटमध्ये राबविले जाणार असून, या प्रकल्पांचा विचार करून केंद्राने देवळालीचा स्मार्ट कॅन्टोन्मेंटमध्ये समावेश होणेसाठी विचाराधीन असून, त्यास लवकरच मान्यताही मिळणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)