शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पक्षांनीही थोपटले दंड

By admin | Updated: January 16, 2017 01:23 IST

आघाड्यांचा प्रयत्न : रिपाइं मात्र महायुतीच्या प्रतीक्षेत

संदीप भालेराव नाशिकमहापालिका निवडणुकीसाठी युती, आघाडी, पक्षप्रवेश आणि बलाढ्य उमेदवारांची इमेज मेकिंग होत असताना छोट्या पक्षांनी आपल्या ‘वोटबॅँके’च्या आधारे निवडणुकीत आव्हान उभे करण्याची रणनिती आखली आहे. याचाच एक भाग म्हणून विशिष्ट समाजघटकांच्या आघाड्यादेखील उदयास आल्या आहेत. या आघाड्यांनी संघटन सत्र सुरू करून निवडणुकीत दंड थोपटले असून, यंदा मराठा आणि बहुजनांचे निघालेले मोर्चे या पार्श्वभूमीवर आघाड्या नशीब अजमाविणार आहे. महापालिका निवडणुकीत आजवर छोट्या पक्षांची कामगिरीही महत्त्वपूर्ण राहिली आहे. माकपा, बसपा, रिपाइं यांसारख्या पक्षांनी पालिकेत प्रतिनिधित्व केलेले आहे. लोकजनशक्ती पार्टी आणि समाजवादी पार्टीनेदेखील एकदा का होईना पालिकेत प्रवेश मिळविला आहे, यंदा माकपाने यंदा १६ जागांवर निवडणूक लढविण्याचे जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. गेल्या निवडणुकीत माकपाने ११ जागांवर निवडणूक लढविली आणि त्यांना तीन जागा मिळाल्या होत्या. यंदा किमान सात ते दहा जागा जिंकण्याचा त्यांचा इरादा आहे. भारिप बहुजन महासंघाने सर्वच जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे म्हटले असले तरी शहरातील त्यांची ताकद मर्यादित असल्याने भारिपकडून इच्छुकही फारसे नसल्याचे वास्तव आहे. नांदेड आणि औरंगाबाद पालिकेत दहापेक्षा अधिक जागा मिळविणाऱ्या ओवीसी यांच्या एमआयएम नाशिक पालिकेत शंभरपेक्षा अधिक जागा लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांची अंतर्गत व्यूहरचना सुरू असून, मोहल्यांमध्ये जाऊन त्यांनी उमेदवारांचा शोध चालविला आहे. नाशिक आणि मुंबई पालिकेककडे यंदा एमआयएमने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे त्यांची भूमिका पालिकेच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नाशिक महापालिकेत किती जागा लढविल्या जाणार हे अद्याप निश्चित नसले तरी पक्षाच्या निरीक्षकांकडून चाचपणी करण्यात आली असल्याचे समजते.बहुजन समाज पार्टीने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. विशेष म्हणजे बसपाकडून निवडणूक लढविण्याबाबत कुणीही फारशी तयारी दर्शविली नसून आघाडीकडे इच्छुक वळत असल्याचे एकूणच चित्र आहे.