शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षे जुन्या बदामाच्या सहा झाडांची कत्तल

By admin | Updated: March 28, 2017 00:46 IST

नाशिक : काठे गल्ली परिसरातील अक्षर इस्टेट परिसरातील कॉलनी रस्त्यालगत २००४ साली लावण्यात आलेल्या बदामाच्या सहा डेरेदार वृक्षांची कत्तल केल्याची बाब उघडकीस आली आहे.

नाशिक : घरात किडे, अळ्या येतात आणि फांद्यांचा त्रास होतो, अशी बिनबुडाची नानाविध कारणे दाखवून काठे गल्ली परिसरात असलेल्या अक्षर इस्टेटच्या कॉलनी रस्त्यावरील दहा ते बारा वर्षे जुनी बदामाच्या सहा झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काठे गल्ली परिसरातील अक्षर इस्टेट परिसरातील कॉलनी रस्त्यालगत २००४ साली लावण्यात आलेल्या बदामाच्या सहा डेरेदार वृक्षांची कत्तल केल्याची बाब उघडकीस आली आहे. मजूर लावून या कॉलनीच्या रस्त्यावरील सहा वृक्ष थेट बुंध्यापासूनच कापून टाकण्यात आली आहेत. याबाबत येथील रहिवासी वृक्षप्रेमी अरविंद निकुंभ यांनी याबाबत दोषी लोकांवर कारवाई करण्याची मागणी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या तक्रार अर्जात निकुंभ यांनी ज्या नागरिकांनी आपापसांत संगनमत करून झाडे तोडण्याचा कट रचला त्या काही संशयित लोकांची नावेदेखील नमूद केली आहेत. उद्यान निरीक्षक कटारे यांनी याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. महापालिका उद्यान विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरात काही विकृ त मानसिकतेचे लोक वृक्षांवर कुऱ्हाड चालवीत असल्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत. उद्यान विभागाला  आलेली मरगळ कधी दूर होईल आणि महापालिका हद्दीत असलेल्या निसर्गाचे संवर्धनास कधी हातभार लागेल? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.