शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खते, बियाण्यांचा शोध घेण्यासाठी सोळा भरारी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 18:50 IST

हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे कृषी खात्याच्या नियोजनाला पुरेसा अवधी मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी बाजारात खतांची होत असलेली कृत्रिम टंचाई आता दूर झाल्याने जिल्ह्याने मागणी नोंदविलेल्या खतांच्या तुलनेत ५० टक्के खते आत्ताच प्राप्त

ठळक मुद्देकृषी विभाग : गुरुवारपासून तालुकानिहाय दुकानांची तपासणी

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : मान्सूनचे आगमन तोंडावर आले असून, शेतकऱ्यांकडून खरिपाच्या पेरणीची तयारी केली जात असताना बी-बियाणे व खतांच्या वापरात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सोळा भरारी पथके गठित केली असून, गुरुवारपासून जिल्हाभरात तालुकानिहाय खते, बियाण्यांच्या दुकानांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कापूस व भाताच्या वाणाची प्रामुख्याने तपासणी केली जाणार आहे.

हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे कृषी खात्याच्या नियोजनाला पुरेसा अवधी मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी बाजारात खतांची होत असलेली कृत्रिम टंचाई आता दूर झाल्याने जिल्ह्याने मागणी नोंदविलेल्या खतांच्या तुलनेत ५० टक्के खते आत्ताच प्राप्त झाली असून, बी-बियाण्यांच्या बाबतीतही समाधानकार परिस्थिती असल्याचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यंदा खरिपाचे पीकनिहाय लागवडीचे क्षेत्रही निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पिके घेण्यासाठी लागणाºया बी-बियाण्यांचा सातत्याने आढावा घेतला जात असून, बाजारातून मिळणाºया बियाण्यातून शेतकºयांची फसवणूक होऊ नये यासाठी फर्टिलायझर दुकानात जाऊन तपासणीसाठी नमुने घेण्यात येतील तसेच शासनाने बंदी घातलेल्या बियाणांची विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात सोळा भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकात कृषी अधिकारी, वजनमाप निरीक्षक, कृषी सहायक, ग्रामसेवकाचा समावेश आहे. गुरुवारपासून पथके प्रत्येक तालुकानिहाय फर्टिलायझरच्या दुकानात जाऊन तपासणी करतील. मान्सूनची सुरुवात झाल्यावर पहिल्या पावसानंतर प्रामुख्याने भात व कापसाची लागवड करण्याकडे शेतकºयांचा कल आहे. तो लक्षात घेता, पहिल्या टप्प्यात भात व कापसाचे वाण तपासण्यावर पथकाचा भर असून, त्यातही कापसावर गेल्या काही वर्षांपासून बोंडअळी, तुडतुड्याचा प्रभाव पाहता, यंदा लागवडीपासूनच त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. महाराष्टÑात गुजरात व आंध्र प्रदेशातून कापसाचे वाण येते, नेमके या वाणातूनच शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे आजवरच्या तपासणीअंती निष्पन्न झाल्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही राज्यांतील सीमा तसेच या सीमेला लागून असलेल्या महाराष्टÑातील गावांकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शेतकºयांनीदेखील कृषी अधिकाºयाच्या सल्ल्यानेच बी-बियाणांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद