शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाधित रुग्णाच्या संपर्कातील १३ संशयित दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 23:28 IST

नाशिक : ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेने बाधिताच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयातील नऊ व्यक्तींसह त्याच्यावर उपचार करणाºया दोघा डॉक्टरांसह तेरा संशयितांना उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गावातील नागरिकांना आगामी चौदा दिवस क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे अकरा पथके घराघरांत जाऊन आरोग्य तपासणी करणार आहे.

ठळक मुद्देउपचार करणाऱ्या दोघा डॉक्टरांचा समावेश : संपूर्ण गाव केले क्वॉरण्टाइन

नाशिक : ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेने बाधिताच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयातील नऊ व्यक्तींसह त्याच्यावर उपचार करणाºया दोघा डॉक्टरांसह तेरा संशयितांना उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गावातील नागरिकांना आगामी चौदा दिवस क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे अकरा पथके घराघरांत जाऊन आरोग्य तपासणी करणार आहे.रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला तत्काळ स्वतंत्र कक्षात हलविण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचेही नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे. सोमवारी सकाळीच आरोग्य विभागाच्या अकरा पथके ग्रामीण भागात धडकली. बाधिताने प्रारंभी दोघा खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले होते. त्या डॉक्टरांनाही रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. आरोग्य यंत्रणेच्या प्राथमिक चौकशीत सुमारे सोळा जणांशी बाधित रुग्णाचा संबंध आल्याची माहिती मिळत असून, त्यानुसार सोमवारी तेरा संशयितांना दाखल करण्यात आले असून, अन्य तिघे लवकरच दाखल होतील असे सांगण्यात आले.बाधित रुग्ण निफाड तालुक्यातील असल्यामुळे आरोग्य विभागाने बाधित रुग्णाचे घर, गाव व नजीकच्या गावांवर लक्ष केंद्रित केले असून, अति जोखीम व कमी जोखीम अशा दोन टप्प्यांत नागरिकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारी आरोग्य विभागाच्या अकरा पथकांनी, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्येक घराघरांत जाऊन तेथील ग्रामस्थांची प्राथमिक आरोग्य तपासणी केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. त्यात सर्दी, खोकला, तापाचे लक्षण असणाºया रुग्णांबाबत काळजी घेऊन त्यांना आगामी चौदा दिवस क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.बाधिताच्या संपर्कात ८० व्यक्तींच्या संपर्काचा अंदाजबाधिताच्या संपर्कात गेल्या अठरा दिवसांत जवळपास ८० व्यक्ती आल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, अशा व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान आहे. त्यासाठी३० वैद्यकीय पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. (सविस्तर पान : २)नाशकात १५ संशयित दाखलनाशिक जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात सोमवारी १५ नवे संशयित दाखल करण्यात आले आहे. त्यात मालेगाव येथील सहा रुग्णांचा समावेश आहे. त्यांचे अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या