शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सहा टक्के मते वाढली

By admin | Updated: February 23, 2017 00:31 IST

जिल्हा परिषद : कळवण, निफाड, नांदगाव आघाडीवर

नाशिक : सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६.८० टक्क्यांनी मतांची टक्केवारी वाढली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने केलेली उपाययोजना व मतदान करवून घेण्यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवार, समर्थकांचे प्रयत्न कामी आले आहेत.  नाशिक जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी जिल्ह्यातील २६४६ मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान घेण्यात आले. काही ठिकाणी मतदारांनी प्रशासनाच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्काराच्या घटना घडल्या असल्या तरी, संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ६९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी २४ लाख २६ हजार ७३५ एकूण मतदार पात्र होते. त्यात १२ लाख ७४ हजार २५२ पुरुष व ११ लाख ५२ हजार ४७९ महिलांचा समावेश होता. त्यापैकी मंगळवारी ९ लाख ६ हजार ९८५ पुरुष व ७ लाख ६७ हजार ५१९ महिला अशा प्रकारे १६ लाख ७४ हजार ५०५ मतदारांनी मतदान केले.  सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाची आकडेवारी ६.८० टक्क्याने अधिक असून, २०१२ मध्ये जिल्ह्यातील ६२.२० टक्के मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. त्यामानाने   यंदा मतांचा टक्का चांगलाच वाढला आहे. गेल्या  निवडणुकीच्या तुलनेत कळवण, निफाड व नांदगाव या तीन तालुक्यांत मतांच्या टक्केवारीत कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यात पेठ तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ७६.५७ टक्के इतके मतदान झाले आहे.  गेल्या निवडणुकीत हाच विक्रम सुरगाणा तालुक्यात नोंदविला गेला होता. २०१२ मध्ये सुरगाणा तालुक्यात ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून विक्रम प्रस्थापित केला. यंदाच्या निवडणुकीत मात्र सुरगाण्याची टक्केवारी कमालीची घटली आहे. जवळपास अकरा टक्के मतदान या तालुक्यात घटल्याची नोंद निवडणूक यंत्रणेने घेतली आहे. (प्रतिनिधी)