शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात सहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:55 IST

इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथे भर दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चौघे तसेच वनाधिकाऱ्यासह पंचायत समिती सदस्याचा मुलगा असे एकूण सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवनाधिकाऱ्याचाही समावेश : आशाकिरणवाडीतील घटना

घोटी : इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथे भर दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चौघे तसेच वनाधिकाऱ्यासह पंचायत समिती सदस्याचा मुलगा असे एकूण सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांनी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी नाशिकच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी गावाजवळ रविवारी (दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी कुत्र्यांना पळवून लावताना बिबट्याला पाहिले. तातडीने वनखात्याला त्याची माहिती कळवण्यात आली. यावेळी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत ग्रामस्थही बिबट्याच्या शोधात बाहेर पडले.बिबट्या नसल्याची सर्वांची खात्री झाली असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने इगतपुरीचे पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांचा मुलगा सचिन (वय २०) याच्यावर हल्ला केला. यावेळी हल्ल्याला प्रतिकार करणाºया पंढरीनाथ किसन शेणे (४०), भिवा किसन शेणे (३८), हिरामण पंढरीनाथ शेणे(२०), सागर पंढरीनाथ शेणे (१४) या एकाच कुटुंबातील चौघांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वनपरिमंडळ अधिकारी ओंकार देशपांडे यांच्यासह एकूण सहा जण जखमी झाले. हल्ल्यानंतर बिबट्याने पलायन केले. ग्रामस्थांनी तातडीने सर्व जखमींना घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ सर्वांना नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहिती समजताच इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांनी नाशिकच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे. दरम्यान, भर दुपारी बिबट्याने हल्ला केल्यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी इगतपुरीचे पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या