शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश न वटल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:25 IST

सटाणा : धनादेश न वटल्याप्रकरणी सटाणा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बँकेच्या खात्यावर पैसे नसतानाही चार लाख रुपयांचा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शेमळी येथील दादाभाऊ अर्जुन शेलार यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देव्याजासह चार लाख पन्नास हजार रु पये देण्याचे आदेशदेना बँकेचा चार लाख रुपयांचा धनादेश दिला होता

सटाणा : धनादेश न वटल्याप्रकरणी सटाणा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बँकेच्या खात्यावर पैसे नसतानाही चार लाख रुपयांचा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शेमळी येथील दादाभाऊ अर्जुन शेलार यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.येथील संजय त्र्यंबक सूर्यवंशी यांना पन्नास हजार रु पये व्याजासह चार लाख पन्नास हजार रु पये देण्याचे आदेश न्यायमूर्ती पी. जी. तापडिया यांनी दिले आहेत. तसेच फिर्यादी सूर्यवंशी यांना न्यायालयाचा झालेला खर्च म्हणून दहा हजार रु पये देण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. संजय सूर्यवंशी यांनी दादाभाऊ शेलार यांना मैत्रीच्या संबंधातून व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन वेळा दोन लाख रुपये उसनवार म्हणून दिले होते. सटाणा न्यायालयाने धनादेश न वटल्याप्रकरणी शेलार यांना सहा महिन्यांच्या शिक्षेसह फिर्यादीस साडेचार लाख रु पये व न्यायालयीन खर्चापोटी दहा हजार असे चार लाख साठ हजार रुपये रोख स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत.शेलार यांनी सूर्यवंशी यांना देना बँकेचा चार लाख रुपयांचा धनादेश दिला होता. ठरलेल्या तारखेला सूर्यवंशी यांनी तो धनादेश आपल्या खात्यावर टाकला असता खात्यात पैसे नाहीत म्हणून तो धनादेश परत आला. धनादेश परत आल्याची कल्पना शेलार यांना देऊनही त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने सूर्यवंशी यांनी सटाणा न्यायालयात दाद मागितली होती.