शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

मालेगावजवळ अपघातात सहा ठार, आठ जखमी

By admin | Updated: May 24, 2016 00:37 IST

मालेगावजवळ अपघातात सहा ठार, आठ जखमी

मालेगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर तालुक्यातील दाभाडी शिवारातील रोकडोबा मंदिर फाट्याजवळ इंडिका व अ‍ॅपेरिक्षा यांच्यात अपघात होऊन दोन बालकांसह सहाजण ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर शहरातील विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दाभाडी परिसरात असलेल्या रोकडोबा मंदिर फाटा व गिरणा कारखाना फाटा या दरम्यान दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास सटाण्याकडे जाणाऱ्या इंडिका कारने (क्र. एमएच १७ एई १३११) ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून भरधाव येणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला (क्र. एमएच ४१ सी ४१०४) धडक दिली. (पान ७ वर)धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा हवेत पाच फूट उंच उडून फेकली गेल्याने तुकडे तुकडे झाले. यावेळी झालेल्या आवाजाने परिसरातील शेतकरी जमा होऊन त्यांनी जखमींना बाहेर काढले.या अपघातात दोन लहान मुले, एक महिला व तीन पुरुष ठार झाले. यात सचिन रवींद्र पटाईत (४), सुशांत रवींद्र पटाईत (२) रा.दोघे चंद्रमणीनगर, द्याने (मालेगाव), पवन नाना सावंत (२४) रा. आर्वीपूर, अ‍ॅपेरिक्षाचालक राजेंद्र रतन शिंदे (२५), रा. इंदिरानगर, दराणे (सटाणा) या चौघांसह एक सुमारे ५५ वर्षीय महिला (ओळख पटलेली नाही) आणि एक २२ वर्षीय तरुण (अनोळखी) यांचा समावेश आहे. या अपघातात अ‍ॅपेरिक्षातील साई पवन सावंत (२), धनश्री पवन सावंत (२१) दोघे रा. आर्वीपूर (धुळे), पूनम रवींद्र पटाईत (२२) रा.चंद्रमनीनगर, द्याने (मालेगाव), अमृता शरद बिरारी (३१) रा. नामपूररोड, मालेगाव, मंडाबाई खरे (५५) रा. जळगाव चोंढी (मालेगाव), कमळाबाई सुनील रेडकर रा. शिवाजीनगर, मालेगाव कॅम्प तर इंडिका कारमधील दत्तू अण्णा शेळके, रा. लखमापूर व बाजीराव नथू लांडगे, रा. धांद्री हे आठ जण जखमी झाले. या जखमींवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली आहे. यातील ५५ वर्षीय मयत महिला व २२ वर्षीय तरुण यांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते. तरुणाच्या खिशात पोलिसांना धरणगाव येथील बसच्या तिकिटाशिवाय दुसरे काहीही मिळून आले नाही तर मयत महिलेबरोबर तिचा लहान नातू आहे. हा लहान मुलगा घाबलेला असल्याने माहिती सांगण्याच्या परिस्थितीत नाही.