येवला : तालुक्यातील नगरसुल येथे वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दि.२४ ते दि.२९ मार्च असा सहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नगरसुल येथे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी भेटी देवून पाहणी करून प्रतीबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी तालुका स्तरावर आढावा घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुचना केल्या होत्या.या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांशी संवाद साधून बुधवार (दि. २४) ते सोमवार (दि.२९) पावेता जनता कर्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे.जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा चालु राहणार असून कोरोना नियमांचे उल्लघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसे प्रसिध्दीपत्रक ग्रामपंचायतीने प्रसिध्द करून ग्रामस्थांनी जनता कर्फ्यूस सहकार्य करण्याचे आवाहनही सरपंच मंदाकिनी पाटील यांनी केले आहे.
नगरसूलला सहा दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:39 IST
येवला : तालुक्यातील नगरसुल येथे वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दि.२४ ते दि.२९ मार्च असा सहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.
नगरसूलला सहा दिवस जनता कर्फ्यू
ठळक मुद्देपरिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुचना केल्या