वडनेरभैरव : परिसरात काल (दि. २२) झालेल्या जोरदार पावसामुळे पिंपळनारे ते बहादुरी हा रस्ता बंद झाला आहे. मुसळधार पाऊस झाल्याने पिंपळनारे ते बहादुरी या शिवरस्त्यावर बांधण्यात आलेली मोरीच वाहून गेली. यामुळे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. या कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करावी. ही मोरी एप्रिल २०१५ ला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत बांधण्यात आली होती. बांधून जेमतेम चार ते पाच महिने झाले होते. ही मोरी वाहून गेल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, जनावरांना इकडचे तिकडे जाता येत नाही. या मोरीच्या बांधकामाची तत्काळ चौकशी होऊन लगेच मोरी बांधण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
शिवरस्त्यावरील मोरी गेली वाहून
By admin | Updated: September 23, 2015 22:09 IST