शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

रेल्वेस्थानकावर सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:39 IST

कसाºयानजीक आसनगावजवळ दुरांतो रेल्वेला झालेल्या अपघातामुळे दुसºया दिवशी बुधवारी मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. लांब पल्ल्याच्या बहुतेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कल्याण व मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या आठ-दहा तासांहून अधिक उशिराने धावत होत्या.

नाशिकरोड : कसाºयानजीक आसनगावजवळ दुरांतो रेल्वेला झालेल्या अपघातामुळे दुसºया दिवशी बुधवारी मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. लांब पल्ल्याच्या बहुतेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर कल्याण व मनमाड मार्गे वळविण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या आठ-दहा तासांहून अधिक उशिराने धावत होत्या. कसाºयाजवळील आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ अतिवृष्टी व दरड कोसळल्याने मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन व नऊ डबे रेल्वे रूळावरून घसरून मोठा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र दुरांतो एक्स्प्रेस रूळावरून घसरल्याने रेल्वे रूळ व ओव्हरहेड वायरचे खांब उखडून गेले. यामुळे मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे बंद पडली आहे. आसनगांव जवळ दुरांतोला झालेल्या अपघातामुळे मंगळवारी अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे कल्याण व मनमाड मार्गे वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या रेल्वे मोठ्या उशिराने धावत होत्या. तर अनेक रेल्वे अर्ध्या मार्गावरून माघारी फिरविण्यात आल्या. अपघातानंतर मंगळवारी मुंबई व आजूबाजूच्या भागात दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने दुरुस्तीच्या कामात मोठा व्यत्यय निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत पावसाची सुरू असलेली संततधार कमी झाल्यानंतर दुरुस्तीच्या कामाने वेग घेतला होता.चोवीस तासांत केवळ एकच गाडीनाशिकरोड रेल्वेस्थानकावर २४ तासांत ६२ रेल्वे येतात व जातात; मात्र मंगळवारी दुपारी १२ वाजता इगतपुरी येथून माघारी बोलविलेली पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकरोडवरून मनमाडला रवाना झाल्यानंतर २४ तास बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकही रेल्वे नाशिकरोड मार्गे धावली नव्हती. बुधवारीदेखील दोन-चार रेल्वे येऊन गेल्या. यामुळे नाशिकरोड रेल्वे- स्थानकावर सर्वत्र शांतता पसरली होती. रेल्वे व प्रवासी येत-जात नसल्याने स्थानका बाहेरील रिक्षा-टॅक्सी स्टॅण्डवरील गाड्यांची संख्या रोडावली होती.नाशिककरांसाठी स्पेशल रेल्वेरेल्वे प्रशासनाने नाशिककर व प्रवाशांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता मनमाड येथुन देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकापर्यंत शटलप्रमाणे स्पेशल रेल्वे सोडली होती. तीच स्पेशल ट्रेन देवळाली कॅम्प येथुन सायंकाळी ६ वाजता मनमाडच्या दिशेने रवाना झाली. तर मनमाड-इगतपुरी शटल आपल्या निर्धारित वेळेला धावली. तर औरंगाबादहुन सुटलेली जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड मार्गे नाशिकरोडपर्यंत येऊन पुन्हा त्याच मार्गे माघारी गेली. तसेच गोरखपुरहून मुंबईला जाणारी गोरखपुर एक्स्प्रेस सायंकाळी नाशिकरोडहुन पुन्हा माघारी मनमाड मार्गे गोरखपुरला रवाना झाली.