शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला लसीकरणाचा गोंधळात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद करुन मतदार यादीनुसार फक्त येथील लोकनेते वाजे विद्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू ...

शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद करुन मतदार यादीनुसार फक्त येथील लोकनेते वाजे विद्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. बुधवारी (दि. ७) नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात येणार होता. मात्र आरोग्य विभाग तथा नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्यतेने लसीकरणाचा सावळा गोंधळ नागरिकांच्या समोर आला. दुपारी ३ वाजता लसीकरणाला सुरुवात होणार असली तरी १२ वाजल्यापासून नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र आरोग्य कर्मचारी ३ वाजेनंतर केंद्रात पोहोचले. नियोजनाअभावी गोंधळ उडाला व लसीकरण बंद पडले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करून जमावाला पांगविण्याची वेळ आली.

बुधवारी वाजे विद्यालयात २५० ते ३०० नागरिक लस घेण्यासाठी उपस्थित होते. गेल्या चार दिवसांपासून लसीकरण बंद असल्याने गर्दी होणार व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होईल, याची कल्पना नगरपालिका व आरोग्य विभागाला होती. तरीही नियोजन नव्हते. गोंधळ उडाल्यानंतर लसीकरण बंद करण्यात आले. मात्र हा त्यावरील उपाय नव्हता, असे तासनतास रांगेत ताटकळलेल्या नागरिकांचे म्हणणे होते. नागरिकांना संतप्त होऊन माघारी परतावे लागले. लसीकरण केंद्रावर गटनेते नामदेव लोंढे, माजी नगरसेवक किरण मुत्रक व काही व्यापारी उपस्थित होते. त्यांनी लसीकरण सुरू करण्याबाबत विनंती केली. परंतु आयोजकांनी नियोजन न करता लसीकरण बंद केले. दुसऱ्या दिवसाच्या नियोजनाबाबत कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने संभ्रम निर्माण झाला. नियोजनबद्ध लसीकरणाचा कार्यक्रम राबवावा, असे नागरिकांचे मत आहे.

कोट....

अनेक वृद्ध व्यक्ती रांगेत उभ्या होत्या. दुपारी तीन वाजता लसीकरण सुरू होणार होते. परंतु नगरपालिका व आरोग्य कर्मचारी दुपारी सव्वातीन वाजता हजर झाले. इतर गोष्टींमध्ये वेळ घालवत त्यांनी वेळकाढूपणा केला. वशिल्याच्या फक्त एक पुरुष व दोन महिलांना लस देण्यात आली. नंतर लसीकरणाचे काम बंद केले.

- छाया ब्राह्मणे, सिन्नर

इन्फो

घरी जाऊन लसीकरण, पोलिसांत तक्रार

शहरात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद असताना नगर परिषद दवाखान्याचा कर्मचाऱ्याने सुटीच्या दिवशी मर्जीतल्या व्यक्तीच्या घरी जाऊन अनधिकृतरीत्या लसीकरण केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते पंकज जाधव यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात केली आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी केली निवेदनात करण्यात आली आहे. सिन्नर नगर परिषदेच्या दवाखान्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड प्रतिबंधित लस (कोव्हॅक्सिन/ कोविशिल्ड) उपलब्ध नसल्याने संपूर्ण सिन्नर शहरात लसीकरण बंद होते. मात्र रविवारी (दि. ०४) सरकारी सुटीच्या दिवशी सिन्नर नगरपालिका दवाखान्यातील कर्मचाऱ्याने शिवाजीनगर येथे एका घरात जाऊन लसीकरण करत असताना रंगेहात पकडल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. यासंदर्भात फेसबुक लाइव्ह व्हिडिओदेखील तयार केल्याचे जाधव यांनी पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीलाही लस देण्यात आल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे.

फोटो - ०८ सिन्नर लसीकरण

सिन्नर येथील लोकनेते वाजे विद्यालयात बुधवारी लसीकरण केंद्रावर झालेली गर्दी.

080721\08nsk_29_08072021_13.jpg

फोटो - ०८ सिन्नर लसीकरण सिन्नर येथील लोकनेते वाजे विद्यालयात बुधवारी लसीकरण केंद्रावर झालेली गर्दी.