शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला स्वच्छता मोहीम

By admin | Updated: April 21, 2017 00:50 IST

सिन्नर : नगरपालिकेच्या वतीने नगरविकास दिन उत्साहात साजरा करण्यात आला

 सिन्नर : नगरपालिकेच्या वतीने नगरविकास दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सार्वजनिक परिसर स्वच्छता मोहीम, पाणी वापराबाबत जनजागृती, बचतगटांतील महिला व सफाई कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर आदि कार्यक्रम राबविण्यात आले. गुरुवारी सकाळी ९ वाजता गोंदेश्वर मंदिर परिसरात नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, महिला स्वयंसहाय्यिता गटाच्या सदस्य व नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवली. परिसरातील गोळा केलेला सर्व कचरा ट्रॅक्टरमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. दुपारी नगरपालिका कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी पालिकेच्या कामकाजाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज करण्याचे आवाहन दुर्वास यांनी यावेळी केले. सफाई कामगारांनी प्रथम आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, आपले आरोग्य चांगले राहिले तर आपण परिसराची साफसफाई करून नागरिकांना चांगले वातावरण देऊ शकणार असल्याचे नगराध्यक्ष किरण डगळे म्हणाले. यावेळी हेमंत वाजे, बाळासाहेब उगले, शैलेश नाईक, विजय जाधव, सुजाता तेलंग, विजया बर्डे, अलका बोडके, प्रतिभा नरोटे, वासंती देशमुख, ज्योती वामने, नितीन परदेशी उपस्थित होते. (वार्ताहर)