शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला लाचेची मागणी करणारा व्यवस्थापक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:56 IST

सिन्नर : फटाक्याच्या स्टॉलसाठी बांधलेल्या गाळ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पुरवठा मिळावा, याासाठी लाच मागितल्याप्रकरणी नगर परिषदेच्या सहाय्यक मिळकत व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची डिजिटल व्हॉईस रेकॉर्डिंगद्वारे पडताळणी करण्यात आली. त्यानंतर संशयिताविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे४२ गाळ्यांचे प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे एकूण ४ हजार २०० रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार

सिन्नर : फटाक्याच्या स्टॉलसाठी बांधलेल्या गाळ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पुरवठा मिळावा, याासाठी लाच मागितल्याप्रकरणी नगर परिषदेच्या सहाय्यक मिळकत व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची डिजिटल व्हॉईस रेकॉर्डिंगद्वारे पडताळणी करण्यात आली. त्यानंतर संशयिताविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तक्रारदार यांचा मंडप व लाइट डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्यांना फटाके स्टॉलसाठी तात्पुरत्या बांधलेल्या ४२ गाळ्यांना विद्युत पुरवठा मिळण्यासाठी नगरपरिषदेचा ना हरकत दाखल्याची आवश्यकता होती. त्यांनी सिन्नर नगर परिषद येथे अर्ज केला होता. सदर अर्जाचे अनुषंगाने तक्रारदार सिन्नर नगर परिषदेचे सहायक मिळकत व्यवस्थापक नीलेश मोतीराम बाविस्कर यांना नगर परिषद कार्यालयात भेटले होते. त्यांनी तक्रारदार यांना ना हरकत दाखला देण्याकरिता ४२ गाळ्यांचे प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे एकूण ४ हजार २०० रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली. ( पान ५ वर)ही तक्रार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकहे प्राप्त झाली होती.तक्रारदार यांचे तकारीवरुन ३० आॅक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाचे सापळापूर्ण पडताळणी केली होती. त्यात संशयित नीलेश बाविस्कर यांनी ना हरकत दाखला देण्याकरीता तक्र ारदार यांचेकडे ४ हजार २०० रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संशयित बावीस्कर यांच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ (सुधारीत सन २०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, बावीस्कर यांना ताब्यात घेण्यात आले असून सायंकाळी उशीरा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सिन्नर पोलिसांनी दिली.