शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सिन्नरला ११९ दिव्यांग बांधवांचे एकाच दिवशी लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:11 IST

सिन्नर : दिव्यांग नागरिकांना लस घेताना रांगेत उभे राहावे लागू नये व गर्दीमुळे दिव्यांग नागरिकांना त्रास होऊ नये, त्यामुळे ...

सिन्नर : दिव्यांग नागरिकांना लस घेताना रांगेत उभे राहावे लागू नये व गर्दीमुळे दिव्यांग नागरिकांना त्रास होऊ नये, त्यामुळे त्यांना प्राधान्य देऊन विनाअडथळा लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सिन्नर नगर परिषद कार्यक्षेत्रातील केवळ दिव्यांग बांधवांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाद्वारे ३० वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे सुरू केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे दिव्यांग नागरिकांना लस घेताना रांगेत उभे राहावे लागू नये व गर्दीमुळे दिव्यांग नागरिकांना त्रास होऊ नये, त्यामुळे त्यांना प्राधान्य देऊन विनाअडथळा लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सिन्नर नगर परिषद कार्यक्षेत्रातील केवळ दिव्यांग बांधवांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी प्रशासनाद्वारे लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते. सिन्नर शहरात वास्तव्यास असलेल्या एकूण दिव्यांगांपैकी ११९ दिव्यांगांना एकाच दिवशी लस देण्यात आली.

जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, मुख्याधिकारी संजय केदार, डॉ. प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, वर्षा साळुंके, कांचन सानप, पुष्पा वैलकर, अनुसया भांसी यांनी समन्वयाचे कार्य करत सिन्नर शहरातील दिव्यांगांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून लसीकरणाबाबत माहिती देण्याचे काम केले. सिन्नर तालुका दिव्यांग प्रहार संघटनेचे पदाधिकारी अरुण पाचोरे, चंद्रकांत पवार व संघटनेचे सदस्य यांनी दिव्यांग यांना लस मिळण्यासाठी साहाय्य केले. लस मिळाल्याबद्दल सर्व दिव्यांगांनी समाधान व्यक्त केले. कर निरीक्षक सचिन कापडणीस, बांधकाम अभियंता मयूरी नवले, तुषार लोखंडे, विजय वाजे, नर्स सुनीता जगताप, आशा स्वयंसेविका कल्याणी मोरे, सुनीता लोंढे, चंद्रकांत बोडके, प्रणव सांगळे यांनी लसीकरणाचे काम पाहिले.

फोटो ओळी- सिन्नर येथे दिव्यांग बांधवांचे एकाच दिवशी लसीकरण करण्यात आले. (३० सिन्नर २)

===Photopath===

300621\30nsk_7_30062021_13.jpg

===Caption===

३० सिन्नर २