शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या वर्षीही सिन्नर तालुका टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

सिन्‍नर : गेल्या अनेक वर्षांपासून टँकरसोबत अतूट नाते बनलेल्या सिन्नर तालुक्याला सलग दोन वर्षांपासून टँकरची गरज भासली नसल्याचे आशादायी ...

सिन्‍नर : गेल्या अनेक वर्षांपासून टँकरसोबत अतूट नाते बनलेल्या सिन्नर तालुक्याला सलग दोन वर्षांपासून टँकरची गरज भासली नसल्याचे आशादायी चित्र आहे.

उन्हाळा आला की, गावोगावी टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना प्रशासनाची तारांबळ उडत होती. दोन वर्षांपूर्वी टँकरच्या प्रतीक्षेत गावाच्या वेशीवर नागरिकांची गर्दी दिसायची. टँकरचे आगमन होताच पाणी भरण्यासाठी झुंबड उडायची. सिन्‍नर तालुक्यातील हे ऑगस्ट २०१९ पर्यंतचे दुष्काळाच्या पाऊलखुणा असलेले चित्र गेल्या दोन वर्षांत पूर्णत: बदलले आहे. जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत झालेली दर्जेदार कामे आणि धो-धो बसरलेला पाऊस यामुळे सिन्‍नर तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला यंदाही ब्रेक लागला आहे.

दरवर्षी डिसेंबरअखेरनंतर पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करण्याचे वेध नागरिकांसह प्रशासनाला लागत असे. काही वेळा तर वर्षभर टँकर सुरू ठेवण्याची वेळ आली होती. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी तालुका टँकरमुक्‍त झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. भोजापूरसह चार धरणांत पुरेसा उपयुक्त साठा शिल्लक असून गावस्तरावरील पाणीपुरवठा योजनाही सुरळीत सुरू आहे. गतवर्षी तालुक्यात ९११ मिमी पाऊस बरसला. गेल्या १५ वर्षांच्या तुलनेत हा सर्वाधिक पाऊस आहे. १२८ टक्के पाऊस झाल्याने पाणीसाठे काठोकाठ भरले. २०१८ ला सर्वाधिक कमी २९८.१ मिमी पाऊस पडला होता. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने व वर्षभर सातत्याने पाऊस पडल्याने टंचाईची स्थिती निवळली आहे. सिन्‍नर तालुका सलग दुसऱ्या वर्षी टँकरमुक्त राहिला आहे.

इन्फो...

४ वर्षांतील टँकरची स्थिती

सिन्‍नर तालुक्यात २०१६ साली ३१, २०१७ साली ६, २०१८ साली ३०, तर २०१९ साली ६८ टँकरद्वारे २७ गावे व ३१३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. तहानलेल्या गावांची तृष्णा भागविताना प्रशासनाची चांगलीच धावपळ उडत होती. सलग दुसऱ्या वर्षी टँकरने पाणीपुरवठ्याची गरज भासली नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.