नाशिक : कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा संप सुरू असतानाच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटना कायम असून, लागोपाठ तिसऱ्या दिवशी सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. अशोक रामचंद्र चकणे (३५) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान शेत गट नंबर ४३१ मधील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीत त्याने उडी मारून आत्महत्या केली. अशोकचे वडील रामचंद्र दगडू चकणे यांच्या नावे गट नंबर ५२२ मध्ये ३ हेक्टर १२ आर जमीन आहे. अशोकच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल्"ात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४६ झाली असून, गेल्या तीन दिवसात चांदवड, येवला व सिन्नर या तालुक्यात लागोपाठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सिन्नरला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: June 8, 2017 00:21 IST