शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला शिवसेनेचा जल्लोष

By admin | Updated: March 22, 2017 00:01 IST

सिन्नर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शीतल उदय सांगळे विजयी झाल्यानंतर शिवसैनिकांनी येथे एकच जल्लोष केला.

सिन्नर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शीतल उदय सांगळे विजयी झाल्यानंतर शिवसैनिकांनी येथे एकच जल्लोष केला. चौकाचौकात आतषबाजी व गुलालाची उधळण करताना कार्यकर्ते दिसून येत होते. ग्रामीण भागातही आनंदोत्सव साजरा करत निवडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सिन्नर तालुक्यातून शिवसेनेचे सर्वाधिक पाच सदस्य विजयी झाल्याने अध्यक्षपद सिन्नरला मिळेल याची चर्चा होती. शीतल सांगळे यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सिन्नरच्या सर्वच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अभिनंदनाचे वर्षाव सुरू झाले होते. प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर व सौ. सांगळे यांना विजयी घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन जल्लोष करण्यास प्रारंभ केला. दुपारी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व शिवसेनेच्या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांचे सिन्नरला आगमन झाले. आमदार वाजे यांच्या संपर्क कार्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार वाजे यांनी सौ. सांगळे यांना लाल दिव्याच्या गाडीत बसवले. त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सौ. शीतल सांगळे यांच्या विजयी मिरवणुकीत आमदार वाजे यांच्यासह नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, उपसभापती वेणूबाई डावरे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सुनीता सानप, वैशाली खुळे, वनिता शिंदे, संग्राम कातकाडे सहभागी झाले होते. (वार्ताहर)