नाशिक : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरतालुका किशोर सूर्यवंशी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत आज सिन्नर व सटाणा संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला़ या दोन संघांत अंतिम सामना शनिवारी (दि़ ८) रंगणार आहे़ अनंत कान्हेरे मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज पहिला उपांत्य फेरीचा सामना सटाणा विरुद्ध मालेगाव अ संघात रंगला़ प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सटाणा संघाने सात गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावा केल्या़ सटाण्याचा फलंदाजाने सर्वाधिक ६१ धावा केल्या़ प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या मालेगाव ‘अ’ चा संपूर्ण संघ १०़३ षटकांत ७५ धावात गारद झाला़ सटाणा संघाचा गोलंदाज जमीर मन्सुरी, कमाल शेख यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या, तर वसीम सय्यद याने दोन विकेट घेतल्या़ सटाणा संघाने हा सामना ४६ धावांनी जिंकला़ दुसरा उपांत्य फेरीचा सामना सिन्नर विरुद्ध निफाड असा रंगला़ सिन्नरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या़ यामध्ये समीर सय्यद ३७, सागर पवार ३६ यांनी योगदान दिले़ अवघड असे ध्येय घेऊन उतरलेल्या निफाडच्या संघाने चांगली लढत दिली; परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडले़ २० षटकांत सर्वबाद १३९ धावा करू शकला़ सिन्नरने १६ धावांनी विजय संपादन केला. सिन्नर व निफाड या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली असून, त्यांच्यात विजेतेपदासाठी जोरदार लढत उद्या दुपारी दीड वाजता अनंत कान्हेरे मैदानावर रंगणार आहे़
सिन्नर, सटाणा अंतिम फेरीत
By admin | Updated: November 8, 2014 00:27 IST