देवी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी शांताराम सुखदेव खताळे (६६) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शांताराम खताळे सकाळी ११ वाजेच्या सुमारास देवी रोडने पायी जात असताना दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्याजवळ येत पुढे पोलिसांचे चेकिंग चालू असून तुमच्या हातातील अंगठ्या आमच्या पिशवीत ठेवा, असे म्हणून त्यांना विश्वासात घेतले. खताळे यांनी अंगठ्या काढून त्या तरुणांच्या ताब्यात देताच क्षणाचाही विलंब न लावता या भामट्यांनी तेथून पळ काढला. लुटले गेल्याची जाणीव होताच खताळे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. चार ग्रॅम वजनाची लक्ष्मीची पावले असलेली एक अंगठी आणि तीन ग्रॅम वजनाची आणखी एक अंगठी असा मिळून एकूण १९ हजार ४६५ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी पोलिसांत दिली.
सिन्नरला वृद्धाकडून अंगठ्या लांबवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:10 IST