शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला रेमडेसिविरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:15 IST

सिन्नर तालुक्यात आतापर्यंत ८,४८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ६,९६५ रुग्ण उपचार करुन बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ...

सिन्नर तालुक्यात आतापर्यंत ८,४८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ६,९६५ रुग्ण उपचार करुन बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १३५ रुग्ण दगावले असून सुमारे १४०० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात इतर तालुक्याच्या तुलनेत सिन्नर तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सिन्नर ग्रामीण रुग्णालय, इंडिया बुल्स, सिध्दिविनायक हॉस्पिटल, यशवंत हॉस्पिटल, परमसाई हॉस्पिटल, शिवाई हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, श्री सदगुरू हॉस्पिटल, डॉ. भडांगे हॉस्पिटल या आठ खासगी कोविड रुग्णालयात शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तथापि, सिन्नरला पाहिजे त्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात नसल्याचा आरोप डॉ. गुरुळे यांनी केला आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यात विनाकारण शाब्दिक वाद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शनिवार, दि. १७ रोजी नाशिक जिल्ह्यात १२६९ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. त्यात निफाडला २३१, येवला ७०, दिंडोरी ९४, नांदगाव ६०, कळवण ५०, सटाणा ४५, गिरणारे ४० अशा संख्येने इंजेक्शन पुरविण्यात आले. मात्र सिन्नर तालुक्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असताना सिन्नरला केवळ ३६ इंजेक्शन देण्यात आल्याचे डॉ. गुरुळे यांनी म्हटले आहे. १९ तारखेला जिल्ह्यात ३५२ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. त्यात सिन्नर तालुक्याला एकही इंजेक्शन मिळाले नसल्याने सिन्नरवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

कोट....

‘सिन्नर ग्रामीण रुग्णालयासह सिन्नरला आठ खासगी कोविड रुग्णालयात शेकडो रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र रुग्णसंख्येच्या तुलनेत सिन्नर तालुक्याला अतिशय कमी प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. सिन्नर तालुक्यावर हा अन्याय आहे. सिन्नरच्या रुग्णालयांवर दुजाभाव करण्यात येऊ नये. रुग्णसंख्या विचारात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा केला जावा.

डॉ. दिलीप गुरुळे, अध्यक्ष