शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला स्वयंस्फूर्तीने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:15 IST

सिन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सिन्नर येथील तहसील कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरात व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. शहरासह ग्रामीण भागात ग्रामस्थांनी बंद पाळून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठींबा दिला. वावी व परिसरातील ग्रामस्थांनी वावी येथे भव्य मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला. वावीसह पांगरी, पाथरे, पांढुर्ली या गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.

ठळक मुद्देसिन्नर शहरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

सिन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सिन्नर येथील तहसील कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरात व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. शहरासह ग्रामीण भागात ग्रामस्थांनी बंद पाळून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठींबा दिला. वावी व परिसरातील ग्रामस्थांनी वावी येथे भव्य मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला. वावीसह पांगरी, पाथरे, पांढुर्ली या गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.सिन्नर शहरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. शांततेच्या मार्गाने दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य मंडप उभारुन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, गोविंद लोखंडे, प्रा. आर. के. मुंगसे, राजाराम मुरकुटे, पंकज जाधव, नामदेव कोतवाल, कृष्णा कासार, हरिभाऊ तांबे, राजेंद्र घोरपडे, डी. डी. गोर्डे, हर्षद देशमुख, शरद शिंदे, किरण खाडे, जयराम शिंदे, अण्णासाहेब गडाख, सोमनाथ भिसे, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, सोमनाथ तुपे यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधवांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला होता. महिलांनी ठिय्या आंदोलनास हजेरी लावून आपला पाठींबा दर्शविला. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे, अण्णासाहेब गडाख, भाजपा व शिवसेनेचे नगरसेवक यांनी ठिय्या आंदोलनास हजेरी लावून आपला पाठींबा दिला. ठिय्या आंदोलनाप्रसंगी लोकप्रतिनिधी, विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते येऊन आंदोलनास पाठींबा दर्शवित मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मनोगत व्यक्त करीत होते. शाहीर स्वप्निल डुंबरे यांच्यासह अनेकजण पोवाडे व गीते सादर करुन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवितांना दिसून आले. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, शहरातील व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी आपली दूकाने व कार्यालये बंद ठेवून आंदोलनास पाठींबा दर्शविला.