नाशिक,अवघ्या जगभरात परिचित असलेले अमृतसरचे सुवर्ण मंदीर. या मंदिराची प्रतिकृती सिन्नरचे सुक्ष्म गणपती बनविणारे कलावंत संजय क्षत्रीय यांनी तयार केली आहे. या मंदिराच्या प्रतिकृती चे वैशिष्ट म्हणजे हे बनविण्यासाठी तब्बल साडेतीन लाख सुवर्ण मनी वापरण्यात आले आहे. पाच बाय सहा फुटाची हि प्रतिकृती बनविण्यासाठी त्यांना तब्बल तीन महिने लागले यासाठी त्यांची पत्नी वंदना, आई , वडील आणि पूजा, अक्षदा या दोन मुलींचे सहकार्य लागले. हि प्रतिकृती बनविण्यासाठी साडे तीन लाख सुवर्ण मनी, फोम सीट, फेविकोल, लाकडी पट्टी, आदींचा वापर करण्यात आला. गणेश भक्तांना तो बघता यावा यासाठी दहा दिवस माहेश्वरी युवक मंडळाच्या मदतीने नरसिंह मंदिरात ठेवण्यात येणार असून याठिकाणी त्यांनी तयार केलेल्या सुक्ष्म गणरायांच्या पंधरा हजार मुर्ती देखील प्रदर्शनात ठेवल्या जाणार आहे
सिन्नरला साकारलय साडे तीन लाख मण्यांचे सुवर्ण मंदीर
By admin | Updated: September 2, 2014 01:12 IST