शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपद्वारे सिन्नरला स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 19:37 IST

सिन्नर : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी १८’ या मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वच्छ भारत मिशन विषयी नागरिकांच्या प्रतिक्रीया नोंदविण्यात येत आहे. त्याची जनजागृती सिन्नर तालुक्यात प्रभावीपणे केली जात आहे.

सिन्नर : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी १८’ या मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वच्छ भारत मिशन विषयी नागरिकांच्या प्रतिक्रीया नोंदविण्यात येत आहे. त्याची जनजागृती सिन्नर तालुक्यात प्रभावीपणे केली जात आहे. तालुक्यातील जास्तीतजास्त ग्रामस्थांनी प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड व सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी केले आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या जिल्'ांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शीतल सांगळे, पंचायत समिती सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महिनाभर स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. गत सप्ताहात गावांची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या समितीने पाहणी केली. गावातील शौचालय सुविधा, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदि बाबींना प्राधान्य असून या बाबतच्या प्रतिक्रीया नोंदविण्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यादृष्टीने पंचायत समिती स्तरावरून सर्व शासकीय व निमशासकीय तसेच गाव पातळीवर अ‍ॅप डाऊनलोड करून अभिप्राय नोंदविण्यात येत आहे. त्या अनशंगाने गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी तालुक्यातील ठाणगाव येथील आठवडे बाजारात फिरून स्वच्छता सर्वेक्षण अ‍ॅप संदर्भात ग्रामस्थांना माहिती दिली व जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान