शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला मोकाट कुत्र्यांचा उच्छाद

By admin | Updated: January 9, 2016 22:50 IST

दहशत : शहरात वृद्ध जखमी, शिंदेवाडीत तीन शेळ्या व वासरू ठार

सिन्नर : शहर व तालुक्यात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, शुक्रवारी सकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरातील एक वृद्ध गंभीर जखमी झाला, तर तालुक्यातील शिंदेवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी एका वासरासह तीन शेळ्यांना ठार केले. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या मोकाट कुत्र्यांचा संबंधित विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शुक्रवारी सकाळी येथील जयवंत क्षत्रिय हे सकाळी साडेसहाच्या सुमारास फेरफटका मारून घरी येत ऐश्वर्या गार्डनसमोर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्यात बेसावध क्षत्रिय अतिशय घाबरले. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन त्यांची भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. यात जखमी झालेल्या क्षत्रिय यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चार-पाच दिवसांपासून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी शिवारातही मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, चार दिवसात वेगवेगळ्या ठिकाणच्या हल्ल्यात या कुत्र्यांनी एक वासरूसह तीन शेळ्यांना ठार केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शाळकरी मुले धास्तावली आहेत. शिंदेवाडी शिवारात चार ते पाच दिवसांपासून कुत्र्यांचा संचार सुरू आहे. ही कुत्रे शेळ्या व वासरांवर, व नागरिकांवर हल्ला करीत आहेत. शिंदेवाडी येथील भाऊसाहेब पुंजा हांडोरे यांचे वासरू तेसच रवींद्र प्रभाकर हांडोरे, चंद्रकांत हांडोरे, जनार्दन गणपत हांडोरे यांची प्रत्येकी एक शेळी या कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झाली. कुत्र्यांच्या टोळीची परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. यामुळे पशुपालक व शाळेत पायी जाणारे विद्यार्थी धास्तावले आहेत. पाळीव प्राण्याबरोबरच माणसांवर या भटक्या कुत्र्यांनी चाल केल्याची घटना घडल्या आहेत. या घटनेची परिसरातील शेतकऱ्यांनी वावी पोलीस ठाण्यात माहिती दिली. सदर भटके कुत्रे अन्य ठिकाणांहून आणून सोडले असल्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीच्या पशुसंवर्धन खात्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करवा, अशी मागणी होत आहे. सिन्नर शहरातही भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याने रात्री-अपरात्री उपनगरात पायी जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. शहरवासीयांना रात्रीच्या वेळी एकटे-दुकटे फिरणेही अवघड होऊन बसले आहे. पालिका प्रशासनाने अप्रिय घटना घडण्यापूर्वी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)