शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

सिन्नरला भाजपाकडून, तर नामपूरला कॉँगे्रसकडून ‘शरद पवार’ रिंगणात !

By admin | Updated: February 16, 2017 00:30 IST

सिन्नरला भाजपाकडून, तर नामपूरला कॉँगे्रसकडून ‘शरद पवार’ रिंगणात !

 सिन्नर/नामपूर : नावात काय असते? असे अनेकदा म्हटले जाते. मात्र कोणत्याही क्षेत्रात एखादी व्यक्ती असे नाव कमवून जाते की त्याची ओळख आणि ते क्षेत्र यांचे नातेच एकमेकांची ओळख बनून जाते. राज्याच्या राजकारणातही काहीसे असेच झाले आहे. महाराष्ट्राचे राजकारण आणि शरद पवार यांचे नाव एकमेकांशी असेच घट्ट जोडले गेले आहे. मात्र निवडणुकीत शरद पवार यांचे नाव भाजपाचे किंवा कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून घेतल्यास अनेकांच्या भुवया उंचावणे साहजिक आहे. असाच काहीसा किस्सा सिन्नर आणि सटाण्याच्या राजकारणात अनुभवायला मिळत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. माळेगाव गणात भाजपाने तर नामपूर गटात कॉँग्रेसने ‘शरद पवार’ नामक उमेदवार रिंगणात उतरविल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.भाजपाकडून माळेगाव गणात उमेदवारी करीत असलेले शरद लक्ष्मण पवार हे मापारवाडी येथील रहिवासी आहेत. पंधरा वर्षांपासून शरद पवार यांचे कुटुंब माळेगाव ग्रामपंचायतीच्या राजकारणात सक्रीय असल्याने माळेगावकरांना स्थानिक राजकारणातील शरद पवार ज्ञात होते. मात्र आता शरद पवार यांनी थेट भाजपाकडून पंचायत समितीची उमेदवारी केल्याने तालुक्यात ते नावामुळे चर्चेत आले आहेत. माळेगाव व मापारवाडी अशी ग्रुपग्रामपंचायत आहे. मापारवाडी येथील रहिवासी असलेल्या शरद पवार यांनी माळेगाव ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम केले आहे. सलग चारवेळा शरद पवार स्वत: किंवा त्यांच्या पत्नी माळेगाव ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नामसाधर्म्यामुळे मापरवाडीचे पवार यांना गावात ‘मंत्री’ या टोपण नावानेही संबोधले जाते. भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्याने ते आणखीनच चर्चेत आले आहे. माळेगाव गणातून शरद पवार यांची लढत शिवसेनेचे भगवान पथवे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अर्जून बर्डे यांच्याबरोबर होत आहे. तर नामपूर गटात शरद पवार यांची लढत भाजपाचे कनू गायकवाड आणि शिवसेनेचे सोमनाथ सोनवणे यांच्याबरोबर होत आहे. नावामुळे चर्चेत असले तरी पवार यांना इतर पक्षांच्या तुल्यबळ उमेदवारांमुळे कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वार्ताहर)