शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एकेरी वाहतूक सुरू मग रस्ता का खुला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:14 IST

टिळकवाडीतून पंडित कॉलनीकडे व पुढे ठाकरे बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकतर्फी वाहतूकबंदी शहर वाहतूक पोलिसांनी लादली असली व ठाकरे बंगल्याकडून टिळकवाडीकडे वाहने नेण्यास पूर्णत: मज्जाव करण्यात आलेला असला तरी, हॉटेल मनोरथजवळ सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला का? असा सवाल पंडित कॉलनीतील रस्ता बंदीमुळे त्रस्त रहिवासी विचारू लागले आहेत.

नाशिक : टिळकवाडीतून पंडित कॉलनीकडे व पुढे ठाकरे बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकतर्फी वाहतूकबंदी शहर वाहतूक पोलिसांनी लादली असली व ठाकरे बंगल्याकडून टिळकवाडीकडे वाहने नेण्यास पूर्णत: मज्जाव करण्यात आलेला असला तरी, हॉटेल मनोरथजवळ सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला का? असा सवाल पंडित कॉलनीतील रस्ता बंदीमुळे त्रस्त रहिवासी विचारू लागले आहेत. एकतर्फी रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे या रस्त्यावरील व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम तर झालाच, परंतु रहिवाशांनाही घर गाठण्या-साठी इंधन वाया घालवावे लागत आहे.  पंडित कॉलनीत दोन रुग्णालये असून, त्यांची वाहने जाण्या-येण्यासाठी रस्ता अपुरा पडत असल्याने त्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे शहर वाहतूक पोलिसांनी ठाकरे बंगल्याकडून टिळकवाडीकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याचा तुघलकी एकतर्फी निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांकडूनच या टिळकवाडीच्या चौफुलीवर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून, त्याच्या आधारे वाहतुकीवर नियंत्रण मिळविले जात असताना गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांनी सदरचा रस्ता एकेरी वाहतुकीसाठीच मोकळा करून दुहेरी वाहतूक बंद केली आहे. त्यासाठी पंडित कॉलनीकडे जाणारा रस्ता लोखंडी बॅरिकेड्सने बंद करण्यात आला आहे जेणे करून ठाकरे बंगल्याकडून येणारी वाहने सिग्नल ओलांडून टिळकवाडी वा शरणपूररोडकडे मार्गस्थ होऊ नये अशी व्यवस्था केली आहे.वाहनचालकाला नियमभंग करू द्यायचा व त्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रकार वाहतूक पोलिसांकडून केला जात असताना दुसरीकडे याच मार्गावर भर रस्त्यात अनेक चारचाकी वाहने उभी राहात असल्याने या वाहनांमुळे पंडित कॉलनीतील वाहतूक विस्कळीत होत नाही काय, असा सवालही येथील रहिवासी करीत आहेत.पोलिसांच्या हेतुबद्दल संशयव्यावसायिक व रहिवाशांनी गजबजलेल्या पंडित कॉलनीतील नागरिकांवर पोलिसांनी हा रस्ता बंदीचा आदेश थोपविला असला तरी, हॉटेल मनोरथजवळ हा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यामागचा उलगडा येथील रहिवाशांना झालेला नाही. रस्ता जर वाहनांसाठी बंदच आहे तर तो बंद ठेवण्यामागच्या पोलिसांच्या हेतुबद्दल संशय घेतला जात आहे. काही विशिष्ट व्यावसायिकांना या रस्त्याचा वापर करता यावा म्हणून हा रस्ता खुला ठेवण्यात आला की, पोलीस वाहतूक सिग्नलवर नसेल तेव्हा त्याचा गैरफायदा नागरिकांनी घेत या रस्त्याचा वापर करावा, असा त्यामागचा हेतु आहे याचा उलगडा मात्र झालेला नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी