शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

दोन व्यक्तींना एकाच क्र मांकाचे आधारकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:33 IST

कळवण : सरकारने घोषित केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अपरिहार्य असताना आधार यंत्रणेच्या सदोष कार्यप्रणालीचा फटका कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला बसल्याने या यंत्रणेच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कळवण या आदिवासी तालुक्यातील दोन व्यक्तींना एकच आधार क्र मांक मिळाल्याने संबंधिताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्देकळवण : यंत्रणेच्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे तरुणांना फटका

 

 

कळवण : सरकारने घोषित केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अपरिहार्य असताना आधार यंत्रणेच्या सदोष कार्यप्रणालीचा फटका कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला बसल्याने या यंत्रणेच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कळवण या आदिवासी तालुक्यातील दोन व्यक्तींना एकच आधार क्र मांक मिळाल्याने संबंधिताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.केंद्र सरकारने अनेक ठिकाणी आधार क्रमांकाची सक्ती केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आधार क्र मांक मिळत असल्याने तो क्र मांकच त्या व्यक्तीची ओळख ठरते. मात्र कळवण तालुक्यातील कुंडाणे (ओ.) येथील वेदांत हिरामण देवरे व उत्तम शिवाजी पवार या दोघांच्या आधार कार्डवर एकच क्र मांक असल्याने या दोघांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दोघांच्या बँक व्यवहाराला तसेच इतर शासकीय कामांना एकच आधार क्रमांक अडथळा ठरत असून, आधार यंत्रणेच्या या मनमानी कारभारामुळे पवार व देवरे यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय अनेक शासकीय योजनांपासून वंचित ठेवले जात आहे. यासंबंधी पवार व देवरे यांनी हेल्पलाइनवर वेळोवेळी संवाद साधला असून, यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारची ठोस माहिती त्यांना दिली जात नसल्याने दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न त्यांना पडला आहे.पवार यांनी आधी आधार कार्ड काढले असून, देवरे यांचे आधार कार्ड नंतरचे आहे. मात्र आधार यंत्रणेकडून पवार यांना नवीन कार्ड काढण्याचा सल्ला दिला गेला. आश्चर्य म्हणजे पॅनकार्डची अदलाबदली करण्याचा सल्लाही दिला गेल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार यासंबंधी तक्र ार देऊनही आधार यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पवार व देवरे यांनी केला आहे.मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून, कागदपत्रांच्या पूर्ततेवेळी व बँकेत काही काम असेल तर आधारक्र मांकामुळे ते होत नाही. शिष्यवृत्तीही रखडते. अनेकदा कामे होतच नाहीत. यंत्रणेच्या चुकीची शिक्षा आम्हाला भोगावी लागत असून, यावर लवकर तोडगा काढावा- वेदांत देवरे, कुंडाणेआधारवरील सारख्या क्र मांकामुळे कुठलेही काम होत नाही. प्रत्येक वेळी स्टॅम्प करून सादर करावा लागतो. स्टॅम्पसाठी आत्तापर्यंत हजारो रु पये खर्च झाले आहेत. नवीन आधार कार्ड काढण्याचा सल्ला देऊन यंत्रणा मोकळी होते. आधार यंत्रणेच्या अशा गलथान कारभारामुळे प्रचंड मनस्ताप होत असून, ही चूक करणाऱ्यांवर कारवाई करावा व आमची समस्या सोडवावी.- उत्तम पवार, कुंडाणे