कांदा लागला सडू
मालेगाव : यंदा कसमादे परिसरात कांद्याचे समाधानकारक उत्पन्न झाले होते. शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणुकीवर भर दिला होता; मात्र कांद्याचे दर कोसळले आहेत. चाळीतील कांदा सडू लागला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
महामार्गावर पांढरे पट्टे मारण्याची मागणी
मालेगाव: शहरालगतच्या टेहरे चंदनपुरी, मुंगसे शिवारातील महामार्गाच्या दुरुस्तीचे काम झाले आहे. महामार्ग डांबरचा थर टाकण्यात आला असून पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. वाहनधारकांना नेमकी दिशा कळत नाही. परिणामी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. टोल वसूल करणाऱ्या कंपनीने तातडीने महामार्गावर पांढरे पट्टे व दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
कोरोनामुळे चंदनपुरीतील
भाविकांची गर्दी ओसरली
मालेगाव : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथील श्री खंडोबा महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी ओसरली आहे. कोरोनामुळे राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत मंदिरे ही बंद करण्यात आली आहेत. केवळ पुजाऱ्यांकडून दररोजची पूजा केली जात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यातील भाविक श्री खंडोबा महाराजांच्या दर्शनाला येत असतात, मात्र कोरोनामुळे चंदनपुरीत शुकशुकाट आहे. लाखो रुपयांची उलाढाल मंदावली आहे.