शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टरवर पसरविला गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:09 IST

नाशिक जिल्ह्यातील ५ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर धरणांमधून काढण्यात आलेला गाळ पसरविण्यात आला असून, त्याचा ८ हजार ९४० शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा दावा संबंधीत विभागाने केला आहे.

ठळक मुद्देसुमारे ९ हजार शेतकऱ्यांना लाभ । पाणीसाठा पुनर्स्थापित झाल्याचा दावा

नाशिक : जिल्ह्यातील ५ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर धरणांमधून काढण्यात आलेला गाळ पसरविण्यात आला असून, त्याचा ८ हजार ९४० शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा दावा संबंधीत विभागाने केला आहे.राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाºया गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची जिल्ह्णात अंमलबजावणी करण्यात येत असून, सन २०१७ ते २०१९ या काळात या योजनेअंतर्गत एकूण १९५६ कामे हाती घेण्यात आली होती. तीन वर्षांच्या काळात जिल्ह्णातील धरणांतून १३ कोटी २८ लाख ८ हजार ३६१ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. काढण्यात आलेला गाळ परिसरातील शेतकºयांनी आपापल्या शेतात पसरविला.एकूण ८ हजार ९४० शेतकºयांनी ५ हजार ४७६ हेक्टरवर गाळ पसरविल्याचा दावा संबंधित विभागाने केला असून, यासाठी २३२ कोटी ४ लाख ४७ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. या कामांमुळे १३२८८.३६ घनमीटर पाणी साठा पुनर्स्थापित झाला आहे. या योजनेच्या सफलतेमुळे वर्षनिहाय या कामांच्या संख्येत वाढ झाली असून, त्यावर होणाºया खर्चामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते. सन २०१७ मध्ये या योजनेअंतर्गत २६२ कामे हाती घेण्यात आली होती त्यावर ३६०.९७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर सन २०१९ मध्ये ९२८ कामे घेण्यात आली असून, त्यावर १०१ कोटी ८ लाख ४६ हजारांचा खर्च करण्यात आला आहे. धरणांतील गाळ काढल्याने त्यांची क्षमता वाढल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत गाळ काढल्यामुळे धरणांमध्ये १३२८८.३६ घनमीटर पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे.मागेल त्याला शेततळेजलयुक्त शिवार अभियान व मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जिल्ह्णातील शेतकºयांना शेतळ्यासाठी अनुदान देण्यात येते. मागेल त्याला शेततळ्यासाठी जिल्ह्णाला सन २०१८-१९ मध्ये ९ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक काम या वर्षात होऊन उद्दिष्टापेक्षा ९५१ अधिक शेतकºयांना शेततळ्यांचा लाभ देण्यात आला आहे. एकूण ९९५१ कामे पूर्ण असून, १११ कामे प्रगतीत आहेत. एकूण ९२९८ शेततळ्यांसाठी अनुदान अदा करण्यात आले असून, त्यावर ४४ कोटी ८७ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

टॅग्स :agricultureशेती