शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला माहेरवाशिणीच्या मृत्यूप्रकरणी मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST

सिन्नर : कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी कोपरगाव पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यासह संशयित आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ...

सिन्नर : कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी कोपरगाव पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यासह संशयित आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सिन्नरचे नागरिक, विवाहितेचे नातेवाईक, क्रांतिसूर्य प्रतिष्ठान व मित्रपरिवाराने सिन्नरच्या तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार राहुल कोताडे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. सिन्नर येथील माहेरवाशीण व शहरात राहणाऱ्या पांडुरंग रामभाऊ लोंढे यांच्या मुलीचे लग्न काही महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील निखिल विलास मेहेत्रे याच्यासोबत झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून सिन्नरची माहेरवाशीण असलेल्या पूजाचा हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रारी नातेवाइकांनी केली आहे. संसार टिकावा म्हणून पूजा अन्याय सहन करीत होती. २६ जुलै रोजी पूजाला तिचा पती व सासरचे अमानुषपणे मारहाण करीत तिला जिवंत जाळून टाकल्याचा आरोप तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. यात कोपरगाव पोलिसांचीही भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मूक मोर्चाच्या वतीने सिन्नरच्या तहसील कार्यालयाच्या आवारात मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले. यावेळी क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शिवसेना शहरप्रमुख गौरव घरटे, प्रहार संघटनेचे शरद शिंदे यांच्यासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक उपस्थित होते.

--------------------

शिवसेना, भाजपचे निवेदन

सिन्नरच्या माहेरवाशिणीच्या मृत्यूप्रकरणी सर्वच पक्षांसह विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख गौरव घरटे, कार्यालय प्रमुख पिराजी पवार यांच्यासह शिवसैनिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही थेट कोपरगाव पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, सजन सांगळे, सचिन गोळेसर, विशाल क्षत्रिय, संतोष क्षत्रिय, सविता कोठूरकर, मंगला झगडे यांनी कोपरगावच्या पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी केली.

--------------------

फोटो ओळी- सिन्नरची माहेरवासिन पूजा लोंढे हिच्या मृत्यूप्रकरणी सिन्नरच्या तहसील कार्यालयावर क्रांतीसूर्य प्रतिष्ठान, नातेवाईक व नागरिकांनी काढलेला मूक मोर्चा. (३१ सिन्नर ४)