शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांचे मौनव्रत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:47 IST

मालेगाव: स्थानिक व जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात व वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. वारंवार सूचना देऊनही प्रशासनाला गांभीर्य उरले नसल्याची भावना व्यक्त करत संतप्त झालेले राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील हनुमान व गणपती मंदिरात बसून मौनव्रत धारण करत निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी शहर व तालुक्यावरील कोरोनाचे संकट दूर करण्याचेही साकडे हनुमानाला घातले.

मालेगाव: स्थानिक व जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात व वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. वारंवार सूचना देऊनही प्रशासनाला गांभीर्य उरले नसल्याची भावना व्यक्त करत संतप्त झालेले राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील हनुमान व गणपती मंदिरात बसून मौनव्रत धारण करत निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी शहर व तालुक्यावरील कोरोनाचे संकट दूर करण्याचेही साकडे हनुमानाला घातले.दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून मालेगावच्या परिस्थितीबाबत जाणीव करून देत ‘मालेगावच्या शेवटच्या नागरिकाच्या अंत्यविधीलाच या’ अशा शब्दात खडसावले. मालेगावी कोरोनाबधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर पोचली आहे. तरीदेखील स्थानिक व जिल्हा स्तरीय यंत्रणेकडून कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या भुसे यांनी शनिवारी (दि.९) त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील हनुमान मंदिरात मौनव्रत धारण केले होते. सदर आंदोलन पाच तास सुरू होते. यावेळी त्यांच्या समवेत सुनील देवरे, संजय दुसाने भरत देवरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर भुसे यांनी मौनव्रत सोडले. दरम्यान नाशिक व धुळ्याच्या लोकप्रतिनिधींनी कोरोना बाधित रुग्ण इकडे आणू नये अशी भूमिका घेतल्यामुळे मालेगावला वाळीत टाकल्याची भावना निर्माण झाली आहे.----------अधिकाºयांकडून मिनतवाºयाकृषिमंत्र्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची माहिती माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेऊन भुसे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा ,तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनीही मंदिराकडे धाव घेतली मात्र त्यांची मध्यस्थी निष्फळ ठरली. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सैंदाणे यांना देखील भुसे यांनी फैलावर घेतले.

टॅग्स :Nashikनाशिक