शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 22:57 IST

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पंतप्रधानांनी देशभर संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या आठव्या दिवशीही ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प असून, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे : पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी

नांदूरशिंगोटे : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पंतप्रधानांनी देशभर संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या आठव्या दिवशीही ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प असून, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे हे गाव अहमदनगर व पुणे महामार्गावर असून हजारो वाहनांची दळणवळण या दोन्हीही रस्त्याने होत असते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून संचारबंदी व लॉकडाउनमुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग नाशिक-पुणे, नांदूरशिंगोटे-लोणी, नांदूरशिंगोटे-अकोले, नांदूरशिंगोटे-वावी, नांदूरशिंगोटे-सिन्नर, नांदूरशिंगोटे- संगमनेर, नांदूरशिंगोटे-ठाणगाव आदींसह ग्रामीण भागातील रस्ते गेल्या दहा दिवसापासून सामसूम आहे. गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर अत्यावश्यक सेवा देणारी लोक तसेच वाहने दिसून आली. त्यामुळे ग्रामीण भागात शुकशुकाट असल्याने सर्वत्र शांतता पसरली आहे. राष्ट्रीय महामार्गावर बोटावर मोजण्याइतकेच वाहनांची रेलचेल दिसून येते. नांदूरशिंगोटे हे गाव दोन्ही जिल्ह्याच्या सरहद्दीवर असल्याने वावी पोलिसांनी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी तर नांदूरशिंगोटे-लोणी रस्त्यावर नांदूरशिंगोटे येथील निमोण रोडवरील उड्डाणपुलाखाली जिल्हा नाकाबंदी करण्यात आली आहे. दोन्हीही ठिकाणी पोलीस कर्मचारी यांच्यासह अन्य विभागातील व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. तहसीलदार राहुल कोताडे, सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आदींसह पंचायत समिती, आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाचे कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.ढाब्यांवर शुकशुकाटसिन्नर ते संगमनेर तसेच नांदूरशिंगोटे ते लोणी या दोन्ही महामार्गांवर जवळपास पन्नास ते साठ ढाबे आहेत. या ढाब्यांबर विश्रांती म्हणून वाहनचालक थांबत असतात. मात्र पंतप्रधांनानी देशभर संचारबंदी लागू केली असल्याने या ढाब्यांवर सन्नाटा निर्माण झाला आहे. ढाबे बंद असल्याने तेथील हवा भरणे, टायर पंक्चर दुरु स्ती करणारे केंद्र सुरु नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडी