शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातून शांततेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:27 IST

नाशिक : हिंसाचाराचे प्रकार रोखण्यासाठी नेटिझन्सने सोशल मीडियातून महत्त्वाची भूमिका पार पाडली. राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून कलुषित झालेले वातावरण व जातीय तेढ कमी करण्यासाठी बुधवारी सोशल मीडियातून अनेकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला, तर अनेकांनी इंग्रजांची ‘तोडा आणि राज्य करा’ या नीतीची आठवण करून देत जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देएकात्मतेचा संदेश : क्रांतिज्योती सावित्रीबार्इंचे स्मरण जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्याचा प्रयत्न

नाशिक : हिंसाचाराचे प्रकार रोखण्यासाठी नेटिझन्सने सोशल मीडियातून महत्त्वाची भूमिका पार पाडली. राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून कलुषित झालेले वातावरण व जातीय तेढ कमी करण्यासाठी बुधवारी सोशल मीडियातून अनेकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला, तर अनेकांनी इंग्रजांची ‘तोडा आणि राज्य करा’ या नीतीची आठवण करून देत जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्याचा प्रयत्न केला.समाजात जातिभेद निर्माण करणाºयांचे आत्मभान जागविण्यासाठी नेटिझन्सनी बुधवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीची आठवण करून दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनभर जातिभेद व सामाजिक रूढी-परंपरांना झुगारून महिला शिक्षणासाठी प्रयत्न केले. वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचविला. त्यांच्या जयंतीच्या दिवशीच शाळा बंद असल्याची आठवण करून देत जातीय तेढ संपविण्याचे आवाहन अनेकांनी सोशल मीडियातून केले, तर इंग्रजांनी भारतात जातिभेदाची बीजे पेरून सामाजिक तेढ निर्माण केली व तोडा व राज्य करा या नीतीने भारताला गुलाम बनविले. इंग्रजांनी केलेल्या जातीय भेदाभेदाच्या विषमय पेरणीचे परिणाम आजही देशाला भोगावे लागत आहेत. जातीय भेद व सामाजिक तेढ यामुळे कोणतीही जात विजयी होणार नाही, तर इंग्रज व त्यांची फोडाफोडीची रणनीतीच विजयी होईल, अशी चपराकही नेटिझन्सनी जातीय भेदाभेद पसरविणाºया समाजकंटकांना लगावली आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा सर्वांनीच आदर करून एकदिलाने नांदण्याचे आवाहनही सोशल मीडियातून अनेकांनी केले आहे, तर काहींनी केवळ शांतता राखा आपण सर्व एक आहोत, असे आवाहन करणारे संदेश सोशल मीडियातून व्हायरल केले.