शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

By admin | Updated: August 11, 2014 00:43 IST

नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

 

नांदगाव : शहर व परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून, जोडीला मलेरियाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून, सध्या किमान ५० ते ६० रुग्ण डेंग्यूग्रस्त झाल्याची माहिती आहे. गुरुकृपानगरात कल्याणी खैरनार(१४), वैष्णवी जगधने(७), मनोज सरोदे(१८), ओम गुमनार (७), रामदास केसकर(३२), साई खैरनार(४) यांना डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. नांदगाव शहरातील डॉ. गणेश चव्हाण, डॉ. आनंद पारख, डॉ. सुनील तुसे, डॉ. यशवंत जाधव, डॉ. वानखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रोहन बोरसे यांनी मलेरिया व डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झाली असल्याचे सांगितले. डॉ. चव्हाण यांच्याकडे उपरोल्लेखित गुरुकृपानगरातील काही अत्यवस्थ रुग्ण उपचारासाठी दाखल होते. मात्र प्लेटलेटसची संख्या झपाट्याने कमी झाल्याने त्यांना मालेगाव व इतरत्र हलविण्यात आले आहे. डॉ. बोरसे यांनी हिसवळच्या नयना देशमुख व गुरुकृपानगरातील तीन व्यक्तींचे रक्ताचे नमुने डेंग्यू चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविले असून, मंगळवार(दि.१२) पर्यंत त्याचे अहवाल प्राप्त होतील.तालुक्यातील नांदूरचे दत्तात्रय मोरे(२२), कोंढारची सुलेखा नाईकवाडे(३५), हिसवळ बुद्रूकची गौरी साळुंके(५) हे डेंग्यू संशयित आहेत. कासारी, जळगाव बुद्रूक, हिसवळ, मूळडोंगरी येथील रुग्ण मलेरिया व डेंग्यू संशयित आहेत. डेंग्यूबाधित ओळखण्यासाठी आयजीजी, आयजीएम व एनएसएक या चाचण्यांचे अहवाल महत्त्वाचे ठरतात. आयजीजी चाचणी पॉझिटिव्ह असली की, लागण एका आठवड्यातली असते. आयजीएम चाचणी पॉझिटिव्ह आली की, लागण दोन आठवड्यांपूर्वी झाली असे सामान्यत डॉक्टर्स गृहीत धरतात. मात्र शासकीय यंत्रणा पुणे येथून अहवाल आल्याशिवाय डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे असे मानत नाही.यात हिमोग्लोबीन, प्लेटलेटस व पांढऱ्यापेशींच्या संख्येचे मापन आवश्यक असते. उपचारासाठी येणारा खर्च अनेकदा अर्धा लक्ष रुपयांच्या घरात जात असल्याने सामान्यांच्या तो आवाक्याबाहेर जातो.नगरपालिका, पंचायत समिती या संस्थांनी तातडीने धुरळणी व फवारणी हाती घ्यायला हवी. तसेच साफसफाईची मोहीम राबवून जनतेला काळजी घेण्याविषयी समुपदेशन करणे गरजेचे आहे. लागणीचे स्वरूप साथीमध्ये रुपांतरित होऊ नये यासाठी किमान वरील खबरदारीचे उपाय तातडीने करणे आवश्यक आहे.महिनाभरापूर्वी तालुक्यात जळगाव बुद्रूक येथील डेंग्यूसदृश व मलेरिया रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती.(वार्ताहर)