शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलची डावी वळणे नावालाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:20 IST

सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणे खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात.

अझहर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे.शहरातील प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणे खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात. शहराच्या सिग्नवरील टायमर मॅनेजमेंट टिकवून ठेवण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्याकरिता आणि अत्यावश्यक, आपत्कालीन स्थितीत तत्काळ वाहनांना मार्ग मोकळा मिळण्यासाठी डावी वळणे खुली असणे गरजेची ठरतात. नाशिकच्या सिग्नवरील सर्वच डाव्या वळणांना जणू कायमस्वरूपी अतिक्रमणसह बेशिस्त चालक आणि वाहतूक नियंत्रण शाखेसह महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेचे ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे. कारण सिग्नल ‘लाल’ झाल्यानंतर वाहने थांबण्यास सुरुवात होते. कुठे ५५, तर कुठे ६५, कुठे ८५, तर कुठे ९२ सेकंदांपर्यंत सिग्नल ‘लाल’ असतो. वाहतूक नियंत्रणासाठी ते आवश्यकही आहे. अशावेळी वाहनांची रांग लागते ही रांग टाळण्यासाठी डावी वळणे खुली राहणे गरजेचे आहे.जिल्हा रुग्णालयाची वाट व्हावी सुकरशहरातील प्रमुख सिग्नल ज्यांचा थेट संबंध जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने जाणाºया वाटेशी येतो त्या सिग्नलवर तरी किमान डावी वळणे खुली राहतील यासाठी शहर वाहतूक शाखा, महापालिका प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी सिग्नल, त्र्यंबकरोडवरील वन कार्यालयाचा सिग्नल, तरण तलाव सिग्नल, सिडको मार्गावरील उंटवाडी सिग्नल, जेहान सिग्नल, सीबीएस सिग्नल, त्र्यंबक नाका हॉली क्रॉस चर्च सिग्नल, गडकरी चौक सिग्नलच्या चारही डाव्या बाजूंची वळणे सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुली कशी राहतील, यादृष्टीने तजवीज करण्याची मागणी होत आहे.वाहतूक नियंत्रण शाखा उदासीनवाहतूक शाखेकडून यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना अथवा नागरिकांचे प्रबोधन केले जात नसल्यामुळे वाहनचालक थेट डाव्या वळणावरच वाहने आणून उभी करतात. यामुळे डावी वळणे जोपर्यंत सिग्नल खुला होत नाही तोपर्यंत बंद होतात. परिणामी सिग्नलवर थांबलेल्या वाहनांपैकी ज्यांना डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे आहे त्यांनाही थांबून रहावे लागते आणि वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते. तसेच सिग्नलवरील मर्यादित वेळेत जेवढी वाहने निघून जायला हवी तेवढी जात नाही तोच पुन्हा सिग्नल ‘लाल’ होतो. एकूणच डाव्या वळणांचा श्वास गुदमरल्यामुळे सिग्नलचे ‘टाइम मॅनेजमेंट’ही धोक्यात आले आहे.नव्या सिग्नलवरही दाखवावे गांभीर्यदिवसेंदिवस शहराची वाढती लोकसंख्या आणि रस्त्यावर धावणाºया वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता काही प्रमुख नऊ चौकांमध्ये नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाकडून अशा चौकांची पाहणीदेखील केली गेली आहे. या चौकांमध्येदेखील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करताना डाव्या वळणांच्या ‘सुरक्षितते’बाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा या सिग्नलवरही ‘देखावा’ पहावयास मिळेल, असे नाशिककरांचे म्हणणे आहे.