शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलवर नाशिककरांकडून वाहनांचे इंजिन होताहेत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:17 IST

‘सरकारवर आता भरोसाच राहिला नाही, पेट्रोल दरवाढीवर बचत हाच एकमेव पर्याय सर्वसामान्यांकडे शिल्लक राहिला आहे’ अशा संतप्त जनभावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वधारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सिग्नलवर बहुतांश दुचाकीस्वारांसह चारचाकीचालकदेखील आता ‘ग्रीन’ सिग्नल मिळेपर्यंत वाहनांचे इंजिन बंद करताना दिसून येत आहेत.

नाशिक : ‘सरकारवर आता भरोसाच राहिला नाही, पेट्रोल दरवाढीवर बचत हाच एकमेव पर्याय सर्वसामान्यांकडे शिल्लक राहिला आहे’ अशा संतप्त जनभावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वधारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सिग्नलवर बहुतांश दुचाकीस्वारांसह चारचाकीचालकदेखील आता ‘ग्रीन’ सिग्नल मिळेपर्यंत वाहनांचे इंजिन बंद करताना दिसून येत आहेत.  पेट्रोल दरवाढीचा भडका कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील पेट्रोलपंपांवर गरजेपुरतेच पेट्रोल वाहनांच्या टाकीत भरताना नागरिक दिसून येत आहेत. दररोज लागेल तेवढेच पेट्रोल भरायचे, असा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. तसेच गरजेच्या वेळीच वाहनाचा वापर करण्याचा प्रयत्नही नागरिक करत आहे. एकू णच पेट्रोलची बचत कशी होईल, यादृष्टीने नागरिक प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. कारण विरोधी पक्षांनी एकत्र येत देशभर इंधनदरवाढीविरोधात एल्गार पुकारल्यानंतरही दरवाढीवर सरकारकडून कुठल्याही प्रकारे नियंत्रण आणण्यात आलेले नाही. याउलट देशभर मोर्चाची लाट उसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेट्रोल दर शंभरीला भिडले. त्यामुळे सत्ताधारी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले जातील, अशी भोळीभाबडी आशादेखील संपुष्टात आली असून दैनंदिन कामकाजातील महत्त्वाचा तसेच जीवनावश्यक घटक असलेल्या पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी होतील यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही.  दरवाढीमुळे नागरिकांनी आता बचतीवर लक्ष केंद्रित केले आहे. जितका शक्य होईल तितका वाहनाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करताना नाशिककर दिसत आहे. तसेच रस्त्यावरून प्रवास करताना शहरातील विविध सिग्नलवर वाहनचालकांकडून वाहनांचे इंजिन स्वयंस्फूर्तीने बंद करण्याचे प्रमाणही वाढले आहे. विशेषत: महिला वाहनचालक याबाबत अधिक खबरदारी घेत असून त्यांच्याकडे स्वयंपाकघरातील गणित जुळविण्याचा अनुभव असल्याने महिला वाहनचालक अत्यंत काटेकोरपणे पेट्रोलची बचत करण्यावर भर देत आहेत. सिग्नलवर थांबताना वाहनांचे इंजिन बंद करताना दिसून येत आहेत.संध्याकाळी पेट्रोलपंपांवर शुकशुकाटपेट्रोलच्या दरवाढीमुळे नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. परिणामी संध्याकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेतही शहरातील त्र्यंबक नाका, गंगापूररोड, पंचवटी, निमाणी, नाशिकरोड, सातपूर-त्र्यंबक रस्ता आदी ठिकाणांच्या पेट्रोलपंपांवर शुकशुकाट बघावयास मिळाला. संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान बहुतांश पंपांवर पेट्रोल डिलिव्हरी करणा-या कर्मचाºयांना वाहनांची प्रतीक्षा करावी लागत होती.पेट्रोल दरात तफावतदराबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण संकेतस्थळासह पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनकडून जाहीर होणारे दैनंदिन पेट्रोल-डिझेलचे दर आणि प्रत्यक्षात शहरातील विविध पेट्रोलपंपांवर केली जाणाºया दर आकारणीमध्ये तफावत आढळून येत आहे. ८९.८७ रुपये असा दर सोमवारी जाहीर केला असला तरी बहुतांश पेट्रोलपंपांवर ८९.८९ किंवा ८९.९० रुपये असा आकारण्यात आला. त्यामुळे पेट्रोलपंपांवर वाद-विवादाचे प्रसंगही घडले.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपPetrolपेट्रोल