शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

द्वारका चौफुलीवर सिग्नल हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:21 IST

नाशिक : द्वारका चौफुलीवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी सिग्नलयंत्रणा कार्यान्वित करणे व सुरळीत चालविणे हाच एकमेव पर्याय असल्याचे मत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी व्यक्त केले आहे. शिवाय, द्वारका चौफुलीवरील सर्कलचा आकारही कमी करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.द्वारका चौफुलीवरील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून पोलीस आयुक्तालयाने ‘यू-टर्न’ची योजना पुढे आणली होती. ...

ठळक मुद्देमनपा आयुक्त : सर्कलचा आकारही कमी करण्याची गरज

नाशिक : द्वारका चौफुलीवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी सिग्नलयंत्रणा कार्यान्वित करणे व सुरळीत चालविणे हाच एकमेव पर्याय असल्याचे मत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी व्यक्त केले आहे. शिवाय, द्वारका चौफुलीवरील सर्कलचा आकारही कमी करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.द्वारका चौफुलीवरील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून पोलीस आयुक्तालयाने ‘यू-टर्न’ची योजना पुढे आणली होती. त्यानुसार, सोमवारी (दि.९) प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक वळविण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. परंतु, दोन तासांतच ही योजना गुंडाळण्याची नामुष्की पोलिसांपुढे ओढवली. द्वारका चौफुलीवरील वाहतूक कोंडीवर उपाययोजनेबाबत महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, द्वारका चौफुलीवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे हाच एकमेव पर्याय आहे. चौफुलीवर सिग्नल यंत्रणेचे व्यवस्थापन नीटपणे हाताळले आणि व्यवस्थित पोलिसिंग झाले, तर वाहतूक सुरळीत होण्यास बरीचशी मदत होईल. याशिवाय, द्वारका चौफुलीवरील सर्कलचा आकारही कमी करण्याची गरज आहे. मोठ्या सर्कलमुळे वाहतुकीला अडथळे उत्पन्न होतात. शहरात महापालिकेने जेहान सर्कल, अ‍ेबीबी सर्कलचे आकारमान कमी केल्याने वाहतुकीचा प्रश्न निकाली निघाल्याचेही आयुक्तांनी सांगितले. सिग्नल यंत्रणा ही अल्पकाळासाठी उपाययोजना होऊ शकेल, परंतु दीर्घकालीन उपाय म्हणून उड्डाणपुलाचाही विचार होऊ शकतो. दरम्यान, द्वारका चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविण्याची जबाबदारी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणची (न्हाई) आहे. त्यांनी महापालिकेकडे प्रस्ताव दिल्यास सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी सहकार्य केले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.