शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एसवायबीएस्सीचा गणिताचा पेपर फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:21 IST

देशभरातील सीबीएससीच्या दहावी आणि बारावीचे पेपर फुटीचे प्रकरण गाजत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाही पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. सध्या पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरू असून, विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाचा ४० गुणांचा लिनियर अलजेब्रा (गणित) विषयाचा पेपर शनिवारी (दि. २८) फुटल्याचे समोर आले आहे.

नाशिक : देशभरातील सीबीएससीच्या दहावी आणि बारावीचे पेपर फुटीचे प्रकरण गाजत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाही पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. सध्या पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरू असून, विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाचा ४० गुणांचा लिनियर अलजेब्रा (गणित) विषयाचा पेपर शनिवारी (दि. २८) फुटल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली असून, ही समिती पेपरफुटीच्या प्रकरणाची दहा दिवसांत चौकशी करून विद्यापीठाला अहवाल सादर करणार आहे.  विज्ञान पदवी शाखेची द्वितीय वर्षाच्या लिनियर अलजेब्रा (गणित) विषयाचा शनिवारी दुपारी पेपर असताना या विषयाची प्रश्नपत्रिका शुक्रवारी रात्रीच सुमारे तीन हजार रु पयांचा व्यवहार होऊन फुटल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पेपरफुटीच्या प्रकरणाबाबत विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ होते. मात्र आपच्या पदाधिकाºयांनी शनिवारी उपनगर पोलिसांच्या मदतीने बिटक ो महाविद्यालयाचे प्राचार्य राम कुलकर्णी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. आपच्या काही पदाधिकाºयांच्या हातात ही प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्यांनी सत्यता पडताळून पहाण्यासाठी साडेअकरा वाजेच्या सुमारास प्राचार्य राम कुलकर्णी यांच्याकडे याबाबत चौकशी केली. कुलकर्णी यांनी त्वरित या विषयाची प्रश्नपत्रिका पडताळून पाहिली असता व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका व विद्यार्थी सोडवित असलेली प्रश्नपत्रिका ही एकच असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपच्या पदाधिकाºयांनी प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय नको म्हणून नाशिक येथील पुणे विद्यापीठाच्या कार्यालयामध्ये जाऊन ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. प्रश्नपत्रिका फुटल्याचे शिक्षकांना माहिती झाल्यानंतर त्यांनीही पुणे विद्यापीठाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. सर्व गोंधळाच्या परिस्थितीत शहरातील विविध महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून हा पेपर सोडवून घेतला आहे. याप्रकरणी विद्यापीठ काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.दोषींवर कारवाई व्हावीच्विज्ञान शाखा पदवीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेदरम्यान शनिवारी (दि. २८) लिनियर अलजेब्रा (गणित) विषयाची प्रश्नपत्रिका शुक्रवारी रात्रीच सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हायरल झालेली प्रश्नपत्रिकाच शनिवारी विद्यार्थ्यांना परीक्षेला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी सिनेट सदस्य अमित पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरु ंना निवेदनाद्वारे केली आहे. विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयात हे निवेदन देण्यात आले. यावेळी आपचे जितेंद्र भावे, भाजपा युवा मोर्चाचे अजिंक्य गिते, आकाश तोरे, हितेश लहानगी, अक्षय नागरे आदी उपस्थित होते.पुणे विद्यापीठाकडून परीक्षा सुरू होण्यापूर्वी अवघ्या दहा मिनिटे अगोदर सर्व महाविद्यालयांना नेटवरून प्रश्नपत्रिका दिल्या जातात. मात्र शनिवारी राज्यात सर्वत्र होणाºया लिनियर अलजेब्रा (गणित) या विषयाची प्रश्नपत्रिका शुक्र वारी रात्रीच ११ वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायलर झाली होती. त्यामुळे गैरप्रकार करणाºया विद्यार्थ्यांचे फावले असले तरी प्रामणिकपणे अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाणाºया विद्यार्थ्यांवर मात्र अन्याय होणार आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालय