येवला : उन्हाचा तडाखा, शेतीची कामे, आणि परीक्षार्थी पेपर लिहिण्यात दंग असल्याने येवला तहसील आवारात सेतू कार्यालयासह परिसरात सध्या शुकशुकाट असल्याचे चित्र दिसत आहे. एरवी भाव खाणारे सेतू कार्यालय दाखला हवा का दाखला? म्हणत ग्राहकांची वाट पाहत आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक संपली. प्रशासन निवडणूक कामात व्यस्त असल्याने, नागरिकांच्या अन्य कार्यालयीन कामकाजांचा विषय काहीसा थंडावला होता.शिवाय सध्या शेतीत गहू हरभरा सह कांद्याची काढणी चालू आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात दंग आहेत. १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा मोसम असल्याने परीक्षार्थी पेपर लिहिताय, आणि उन्हाचा तडाखाही बसू लागल्याने तहसील कार्यालयाच्या परिसरात शुकशुकाट दिसत आहे. शिवाय तहसील कार्यालयातील ५० टक्के कर्मचारी लोकसेवा कायदा हक्कच्या प्रशिक्षणासाठी नाशिकला गेल्याने कार्यालयात निम्म्या खुर्च्यादेखील रिकाम्या दिसत आहे. (वार्ताहर)
येवला तहसील कार्यालय आवारात शुकशुकाट
By admin | Updated: March 5, 2017 00:31 IST