शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड बाजारपेठेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:39 IST

दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालल्याने त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला असून, दुपारच्या सुमारास तर बाजारपेठेत अघोषित संचारबंदी लावल्यासारखी स्थिती आहे.

नाशिकरोड : दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालल्याने त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला असून, दुपारच्या सुमारास तर बाजारपेठेत अघोषित संचारबंदी लावल्यासारखी स्थिती आहे.थंड हवेशीर आल्हाददायक अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात तपमान ४० अंशांकडे झुकल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाचा चटका सहन होत नसल्याने त्याचा परिणाम सर्वच व्यवसायावर होत आहे. यामुळे नाशिकरोडची मुख्य बाजारपेठ असलेल्या देवी चौक, सुभाषरोड, आंबेडकररोड या रस्त्यावर अघोषित संचारबंदी लावल्यासारखी स्थिती दुपारच्या काळात निर्माण होत आहे.उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी साडेअकरा-बारा वाजेपासून सायंकाळी पाच-साडेपाच वाजेपर्यंत बहुतांश व्यावसायिक, दुकानदार, रस्त्यावरील विक्रेते आपली दुकाने बंद करून घेण्यातच धन्यता मानतात. सायंकाळपासून बाजारात खरेदीची थोडी रेलचेल सुरू होते. एकीकडे उन्हाची तीव्रता व दुसरीकडे लोकसभा निवडणूक फिव्हर यामुळे बाजारपेठेत शांतता पसरली आहे. उन्हाच्या चटक्यामुळे रसवंतीगृह, दही, ताक, सरबत, टरबूज विक्रेते यांचा व्यवसाय मात्र जोरात सुरू आहे. ७ मे नंतर लग्नतिथी दाट असल्याने एप्रिल महिन्याच्या अखेरीस निवडणूक मतदानानंतरच व्यवसायात तेजी येईल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.सर्वच व्यवसायात मंदीचे सावट असून त्यात असह्य उन्हाची तीव्रता व निवडणुकीचे वातावरण यामुळे बाजारपेठेतदेखील शांतता आहे. निवडणूक मतदानानंतरच मे महिन्यात दाट लग्नतिथी आहे. तसेच उन्हाची तीव्रतादेखील उतरायला लागेल. त्यामुळे मे महिन्यापासून सर्वच व्यवसायाला चालना मिळेल.- सोमनाथ मोरे, व्यावसायिक

टॅग्स :TemperatureतापमानMarketबाजार