दिंडोरी : यंदा साखरेचे भाव कोसळल्याने संपूर्ण देशात साखर कारखाने अडचणीत आले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था या व्यवसायावर अवलंबून असताना साखर कारखाने अडचणीत येणे कृषिप्रधान देशाला परवडणार नाही. केंद्र सरकारने तातडीने मदत करत वेळीच उपाययोजना केरावी नाही तर यंदा साखर कारखाने सुरू होणे अवघड आहे. केंद्राने तातडीने मदत करण्याची मागणी राज्य सहकारी साखर संघाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केली आहे.राज्य सहकारी साखर संघाचे निवडणुकीत श्रीराम शेटे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली असून त्यांचा कादवाचे कामगार सभासद यांचे वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद बाकेराव जाधव होते. ते पुढे म्हणाले साखर कारखान्यांवरील हे पहिलेच संकट नसून वारंवार असे प्रसंग उद्भवले आहे; मात्र माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी यावर वेळीच उपाययोजना करत या धंद्याला सावरले असून आता पुन्हा तस्याच उपाययोजना होण्याची नितांत गरज आहे. एकीकडे उसासाठी किमान दर निश्तिती केली असताना साखरीचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना उर्विरत रक्कम कसे द्यायचे कामगारांचे पगार कुठून द्यायचे पुढील हंगामासाठी उसतोड कामगार यांना उचल कसी द्यायची असा प्रश्न देशातील सर्व कारखान्यांना पडला आहे . साखरेच्या प्रत्येक पोत्यामागे सातशे आठशेचा तोटा कारखान्यांना कर्जाच्या बोज्यात संपवणारा ठरणार आहे. केंद्र राज्य मदतीचे आश्वासन दिले असले तरी हि मुदत कर्ज रु पी असून कर्ज घेवून कोणत्याही कारखान्याला परवडणारे नसून तसे झाले तर ती कारखान्याची मृत्यू घंटा ठरणार आहे.कर माफी, योग्य आयात निर्यात धोरण राबवत, अनुदान देत या धंद्याला सावरणे गरजेचे असून साखर संघाच्या माद्यमातून आपण सहकारी साखर कारखानदारी टिकून राहावी व शेतकर्यांचे उसाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करू असे साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले. यावेळी जिप उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कृउबा सभापती दत्तात्रेय पाटील, माजी सभापती सदाशिव शेळके, संचालक शहाजी सोमवंशी, संजय पडोळ ,बाकेराव जाधव भास्कर भगरे, डॉ साहेबराव भुसाळ आदिंनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्राचार्य लक्ष्मण महाडिक व सर्व संचालक, अधिकारी, कामगार, सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते. सूत्रसंचालन यांनी केले. (वार्ताहर)
श्रीराम शेटे : कादवा कामगार, सभासदांच्या वतीने सत्कार
By admin | Updated: August 24, 2015 23:33 IST