शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम, गरुड रथोत्सव

By admin | Updated: April 18, 2016 00:36 IST

रामनवमी : विविध ढोल पथक आणि रांगोळ्यांनी सजला रथमार्ग

नाशिक : सियावर रामचंद्र की जय, जय सीता जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय अशा जयघोषाने पंचवटीतील प्राचीन काळाराम मंदिर परिसरातून रविवारी (दि. १७) कामदा एकादशीनिमित्त रामरथ आणि गरूडरथाची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. रविवारी संध्याकाळी रामाच्या पादुका आणि भोगमूर्तींचे विधिवत पूजन करून श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजातून मिरवणूक सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली.यावर्षीचे रथ उत्सवाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गरूड रथात रामाच्या पादुका आणि रामरथात भोगमूर्ती ठेवून विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली. गरूडरथाचे अध्यक्ष बाळासाहेब पुजारी आणि रवि दीक्षित तसेच गरूड आणि रामरथाचे मानकरी असलेल्या अहिल्याराम व्यायामशाळा, सरदार रास्ते आखाडा तालीम संघ आणि पाथरवट समाजाच्या पदाधिकाऱ्यांना मानाचे गंध लावून सत्कार करण्यात आल्यानंतर दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या. नाशिकचा ग्राम उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवात शेकडो रामभक्त सहभागी झाले होते. सियावर रामचंद्र की जय...कामदा एकादशीदिनी श्री काळाराम मंदिरापासून श्रीराम आणि गरुड रथाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री गोदातटी रथदर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.