शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीकाठच्या शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:17 IST

कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील गिरणा नदीकाठच्या शिवारात गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार तर म्हशीला व पारडूला जखमी केले.

पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील गिरणा नदीकाठच्या शिवारात गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार तर म्हशीला व पारडूला जखमी केले. येथील शेतकरी महादू हरी खैरनार यांच्या वाड्यातील बांधलेल्या वारसावर बिबट्याने हल्ला करून ठार केले, तर म्हैस व पारडूला जखमी केले. यात खैरनार यांचे बरेच नुकसान झाले आहे. शेतकºयांनी कळवण वन विभागाला कळवले असता, वनकर्मचाºयांनी धाव घेत परिसराची पाहणी केली. मोकभणगीचे वनपरीमंडळ अधिकारी शशिकांत वाघ यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. आहेरराव यांनी जखमी पारडू व म्हशीवर उपचार करून वन विभागाला अहवाल सादर केला. वन विभागाच्या वतीने परिसरातील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचा तसेच फटाके फोडण्याचा व घर-जनावरांच्या शेड, गोठ्यातील लाइट सुरू ठेवाव्याचे आवाहन वनपरीमंडळ अधिकारी शशिकांत वाघ, वनरक्षक डी. जे. भोये, वनमजूर विवेक पाटील यांनी केले आहे. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. गिरणा नदीकाठ परिसरात व शिवारात रात्री व पहाटेच्या सुमारास अनेकांना बिबट्या व मादीचे दर्शन झाले असून, ग्रामस्थ व शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी चिंतामन बच्छाव, शिवाजी बच्छाव, सचिन खैरनार, विवेक बच्छाव, दौलत बच्छाव, सचिन पाटील, संदीप पाटील, विजय खैरनार, महादू खैरनार, भूषण बच्छाव, कैलास पाटील, उमेश बच्छाव यांसह परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.शेत शिवारात राहणाºया शेतकरी व शेतमजुरांनी, लहान मुलांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडू देऊ नये. पाळीव जनावरे रात्री बंधिस्त गोठ्यात बांधावी व जनावरे असलेल्या ठिकाणीचे दिवे सुरू ठेवावे. मेंढपाळ व पशुपालकांनी परिसरात फटाके फोडावे. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात लवकरच पिंजरा लावण्यात येईल.- शशिकांत वाघ, वनपरीमंडळ अधिकारी, मोकभणगी

टॅग्स :leopardबिबट्या