शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युवकांच्या व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’

By admin | Updated: September 8, 2015 22:53 IST

प्रेरणादायी : पदवीधर असूनही नोकरी मिळत नसल्याने ते बनले मूर्तिकार

शैलेश कर्पे, सिन्नरघरी मोठी शेतजमीन असताना पर्जन्यमानाच्या लहरीपणामुळे शेतीत उत्पन्न मिळत नाही. परिस्थितीवर मात करून मन लावून शिक्षण घेतले, पदवी मिळवली, मात्र नोकरी नाही. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील वावी येथील सुशिक्षित युवकांनी मूर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी सुमारे सातशे आकर्षक व सुबक गणेशाची विविध रुपे साकारून जिद्द व मेहनतीने परिस्थितीवर मात करता येते याचा आदर्श सुशिक्षित बेरोजगार युवकांपुढे ठेवला आहे. वैभव नवले हा वावी परिसरातील हरहुन्नरी कलाकार. े जी. डी. आर्टचे शिक्षण घेऊन व हातात चांगली कला असूनही नोकरी मिळत नसल्याने वैभव नवले याने मोहित अहेर याच्या साथीने मूर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मोहित अहेर यानेही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय शिक्षणाचे धडे गिरवले. नोकरी नसल्याने या दोघा युवकांनी आपली कला व्यवसायासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. मूर्तीचे साचे व साहित्य आणून ते गणेशाची विविध रुपे साकारू लागले. त्यांनी बनविलेल्या आकर्षक मूर्ती पाहून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही त्यांना मदतीचा हात पुढे केला. वैभव हा चांगला पेंटर असल्याने त्याने गणेशाच्या मूर्तीही चांगल्या रंगवल्या. त्यामुळे या उभय युवकांच्या गणपती बनविण्याच्या ठिकाणावर बघ्यांची गर्दी वाढू लागली आहे.