शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला श्री रेणुका माता मंदिर घटस्थापनेपासून उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST

चांदवड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटस्थापनेपासून सर्वच मंदिरे उघडण्याची घोषणा केल्याने भाविकांसह संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे ...

चांदवड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटस्थापनेपासून सर्वच मंदिरे उघडण्याची घोषणा केल्याने भाविकांसह संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी मात्र यंदा दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमुळे होणारा यात्रोत्सव होईल की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.

येथील कुलस्वामिनी श्री रेणुका मातेचे पुरातन मंदिर असून, हजारो वर्षांपासून येथे दर नवरात्र उत्सवात यात्रोत्सव भरतो. गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने परिसरातील व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. तर मंदिर संस्थानही कर्मचारी पगार व इतर व्यवस्थापन खर्चामुळे बेजार झाला होता. श्री. रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक एम. के. पवार, सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी मात्र यात्रोत्सवास परवानगी मिळेल न मिळेल मात्र लगेच मंदिर परिसरातील स्वच्छता, डागडुजी, मंदिरातील विजेची उपकरणो, पंखे व इतर सर्व कामास वेग घेतल्याचे सांगीतले, तर बऱ्याच दिवसांपासून कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने मंदिरात प्रवेश करण्यासाठी लावलेले बॅरिकेडिंग व परिसरात घाणीचे व धुळीचे साम्राज्य पसरले होते. ते ही स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. शासनाचा मंदिर उघडण्याचा आदेश झाला असला तरी यात्रोत्सवाबाबत संभ्रम आहे, तर बाहेरगावचे व स्थानिक यात्रेत दुकाने थाटणाऱ्या दुकानदारांनी सुभाष पवार यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे.

---------------------------

कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तिंनाच मंदिरात प्रवेश राहणार आहे. धार्मिक स्थळाचे स्वरूप बघून भाविकांना प्रवेश द्यायचा यांचा निर्णय अजून व्हायचा आहे. यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. मंदिरात आत प्रवेश करण्याचा मार्ग व आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा असावा, भक्तांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे, कन्टेन्ट झोनमधील मंदिरे बंद राहतील, तर ६५ वर्षांवरील नागरिक, गरोदर माता आणि दहा वर्षांखालील बालकांना मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले.

---------------------------------------------------

फोटो क्रमांक - 25 एम.एम.जी.8- चांदवड येथील श्री रेणुका देवी मंदिर परिसरात स्वच्छता करताना कर्मचारी.

---------------------------------------------

फोटो क्रमांक - 25 एम.एम.जी.9- चांदवड येथील श्री. रेणुका देवी मंदिर परिसरात भाविकांची बैठक व्यवस्था दुरस्त करतांना कर्मचारी

---------------------------------------

फोटो क्रमांक - 25 एम.एम.जी.10- चांदवड येथील श्री. रेणुका देवी मंदिर परिसरात स्वच्छता करतांना कर्मचारी.

250921\25nsk_30_25092021_13.jpg~250921\25nsk_31_25092021_13.jpg~250921\25nsk_32_25092021_13.jpg

२५ एमएमजी ८~२५एमएमजी ९~२५ एमएमजी १०